Sambhajinagar News Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar News : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच ठाकरे गटाला मोठी खिंडार; २ माजी नगरसेवकांसह १२ जणांनी दिले राजीनामे

Sambhajinagar News : आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. दोन माजी नगरसेवकांसह बारा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाराज पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला सोडचिठ्ठी दिली जात आहे. त्यानुसार संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला देखील खिंडार पडली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रमुख १४ पदाधिकाऱ्यांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. 

आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाला मोठी खिंडार पडली आहे. दोन माजी नगरसेवकांसह बारा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve), चंद्रकांत खैरे यांच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामे देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे आम्ही हिंदुत्वासाठी काम करणार आहेत. नेमका कुणाचं काम करणार हे दोन-तीन दिवसात सांगू असं देखील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. 

शिंदे गटात जाण्याची तयारी 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार किशनचंद तनवाणी हे शिवसेना शिंदे गटामध्ये दहा किंवा बारा तारखेला प्रवेश करणार आहेत. किशनचंद तनवाणी यांचे समर्थक असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकारीही आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी किशनचंद तनवाणी हे त्यांच्या समर्थकांसोबत प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंद

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

SCROLL FOR NEXT