Sambhajinagar Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Crime : शेतकऱ्याच्या घरातून १ लाखांचा ऐवज लंपास; रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना घडली घटना

sambhajinagar News : रात्रीच्या सुमारास घराला कुलुप लावुन शेतात असलेल्या मोसंबी बागेला पाणी भरण्यासाठी गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला असलेले कुलुप तोडुन घरात प्रवेश केला

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शेतातील मोसंबी बागेला रात्री पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करत (Theft) चोरी केली. या घटनेत घरातून रोख रक्कम ५० हजार व सोन्याचे दागिने असा अंदाजे (Sambhajinagar) एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. (Latest Marathi News)

सदर घटना संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील पारुंडी येथे उघडकीस आली. (Paithan) पैठणच्या पारुंडी (Farmer) शेतकरी मेहताब बाप्पु शेख हे रात्रीच्या सुमारास घराला कुलुप लावुन शेतात असलेल्या मोसंबी बागेला पाणी भरण्यासाठी गेले होते. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराला असलेले कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. घरात असलेली पेटी घेवुन पोबारा केला. त्यात असलेली रोख रक्कम व दागिने घेवुन पसार झाले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान सकाळी शेतकरी महेताब शेख हे घरी परत आल्यावर त्यांना दार उघडे दिसले. त्यांनी घरात जाऊन बघितल्यावर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. सदरच्या चोरीच्या घटनांचा कसून तपास करुन आरोपींना जेरबंद करावे; अशी मागणी आडुळसह परिसरातुन होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरार पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर स्कूल बसमध्ये बिघाड

Shiv Sena Symbol Dispute: खरी शिवसेना कोणाची? पक्ष, चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी

Tax Refund: ITR भरल्यानंतरही रिफंड आला नाही? तुमची ही एक चूक पडू शकते महागात

SA20 Season 5: पाचव्या सिझनच्या ऑक्शनपूर्वी MI केपटाऊनचा मोठा निर्णय; कायरन पोलार्ड आणि ट्रेंट बोल्टला केलं रिलीज

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

SCROLL FOR NEXT