Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Cyber Crime: सहाच महिन्यांत १८५३ जणांना कोट्यावधींचा गंडा; ४७ टक्‍क्‍यांनी वाढली सायबर गुन्‍हेगारी

सहाच महिन्यांत १८५३ जणांना कोट्यावधींचा गंडा; ४७ टक्‍क्‍यांनी वाढली सायबर गुन्‍हेबारी

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्‍याचे पाहायला मिळत आहे. यात छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यात यावर्षी सहा महिन्यात तब्बल १८५३ जणांना कोट्यावधी (Cyber Crime) रुपयांनी गंडवल्याच्या समोर आले आहे. (Maharashtra News)

दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु सायबर पोलिसांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ तांत्रिक अडचणी आणि या गुन्हेगारांचे देशभरात पसरलेल्या अफाट नेटवर्कमुळे सायबर क्राईमचा वाढता आलेख हा पोलिसांसमोर (Cyber Police) नवीन आव्हान ठरत चाललेला आहे. तसेच दिवसागणिक सायबर क्राईममध्ये फसवणुकीचा ट्रेंड बदलत चालला आहे. मागील वर्षी इन्स्टंट बँक लोन ॲपद्वारे फसवणुकीचे प्रमाण वाढले होते. तर यावर्षी पार्ट टाइम जॉब, वर्क फ्रॉम होमचे आम्हीच दाखवून ऑनलाईन फसवण्याचे प्रमाण अधिक आहे सोबतच सोशल मीडियावर मैत्री करून भामटे लाखो रुपये उकळतात.

४७ टक्‍क्‍यांनी वाढली सायबर गुन्‍हेबारी

गतवर्षीच्या तुलनेत संभाजीनगर जिल्‍ह्यात यंदा सहा महिन्यातच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेल्यांचे प्रमाण तब्बल ४७ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षभरात १८५३ नागरिक सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकले होते. तर यावर्षी जून महिन्यापर्यंतच हा आकडा १८५३ पर्यंत पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात दिवसाला सहा तक्रारदारांना मागे एक महिला असल्याचे वास्तव आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक झालेल्यांमध्ये महिला, सेवानिवृत्त, वकील, डॉक्टर आणि व्यावसायिक यांचा समावेश आहे.

३ कोटी रूपये गमावले

जानेवारी ते जून २०२३ या दरम्यान तब्बल ११३६ तक्रारी प्राप्त झाले आहेत. यामध्ये सुमारे तीन कोटी रुपये तक्रारदारांनी गमावले. त्यापैकी सायबर पोलिसांनी तपास करून ३३ लाख ३२ हजार रुपये परत मिळवून दिले आहेत. ग्रामीण भागात मात्र शहरा भागापेक्षा ऑनलाईन फसवणाऱ्याचे प्रमाण तुलनेने कमी पाहायला मिळते. एकंदरीतच सायबर पोलीस याविषयी वेळोवेळी जनजागृती करत असताना देखील सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते. यामुळे सायबर पोलिसांसमोर एक नवीन आव्हान उभा राहिलाय नागरिकांनी देखील सोशल मीडियावर कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपली फसवणूक टाळावी असे आवाहन सायबर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT