Sambhajinagar Accident Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Accident : टेम्पो- दुचाकीचा भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Sambhajinagar News : नागपूर- मुंबई महामार्गावर वैजापूर तालुक्यातील लासूरगाव शिवारात हा अपघात घडला. महामार्गावरून एका भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात (Accident) वैजापूर तालुक्यातील लासुरगाव शिवारात घडला. 

नागपूर- मुंबई महामार्गावर वैजापूर तालुक्यातील लासूरगाव शिवारात हा अपघात घडला. महामार्गावरून (Sambhajinagar) एका भरधाव जाणाऱ्या टेम्पोने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला. (Nagpur) नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळ लासुर गावातील निसार उर्फ बबलू करीम कुरेशी हे आपल्या दुचाकीने लासुर गावात जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवर असलेल्या निसारचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांकडून पंचनामा 

दरम्यान सदर अपघाताची माहिती मिळताच वैजापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करत अपघातातील मृतास पुढील तपासणीसाठी लासुर स्टेशन येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT