सोलापूर: सोलापूरातील तुळजापूर नाका येथील दत्तनगर मंठाळकर वस्ती संभाजीनगर चंद्रबल रामनगर लक्ष्मीनगर या नगरांमधील पाण्याच्या (water) प्रश्नामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलादिनी महिलांचा घागर मोर्चा महानगरपालिकेवर (Municipal Corporation) काढण्यात आला आहे. या नगरा पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी नाही रस्ते पाणी ड्रेनेज या मूलभूत सुविधांची वनवा आहे. (Sambhaji Brigade Women Day Morcha Municipal Corporation for Water)
हे देखील पहा-
त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकरद्वारे २-३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता पण गेल्या महिन्यापासून या भागातील नागरिकांना ७-८ दिवसानंतर टँकरने पाणीपुरवठा (Water supply) करण्यात येत आहे. पाणी हे जीवन आवश्यक बाब असून पाण्याविना येथील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या भागातील महिला (Women) आज एकत्र येऊन महानगरपालिका घागर मोर्चा काढण्यात आला.
तसेच त्यातील काही संतप्त महिलांनी या ठिकाणी मटका फोडून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जाधव,दत्ता जाधव,सुनील सोनवणे,महादेव बडवणे,कर्णिक स्वामी, उमेश सुरवसे,रमेश सुरवसे,नंदकुमार सुरवसे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.