sambhaji bhide  saam tv
महाराष्ट्र

टिकली प्रकरणात संभाजी भिडेंची महिला आयोगाला विनंती, उत्तर देण्यास मागितला 10 दिवसांचा अवधी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : 'साम' टीव्हीच्या महिला पत्रकाराने टिकली लावली नाही म्हणून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी भिडे (Sambhaji bhide)  यांना महिला आयोगाने नोटीस पाठवत सविस्तर उत्तर मागवलं होतं. मात्र आता संभाजी भिडेंनी महिला आयोगाला उत्तर देण्यासाठी वाढीव अवधी मिळावा यासाठी विनंती केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटलं की, महिला पत्रकाराचा टिकली लावली नाही म्हणून अवमान करणाऱ्या संभाजी भिडेंनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस राज्य महिला आयोगाकडून बजावण्यात आली होती. आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला 10 दिवसांचा अवधी मिळावा असा विनंती अर्ज संभाजी भिडे यांनी कार्यालयाकडे केला आहे. (Latest Marathi News)

संभाजी भिडे काय म्हणाले होते?

संभाजी भिडे हे 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे यांनी प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांना थांबवले. यावेळी भिडेंनी त्यांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. दरम्यान त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

'आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो', असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौहेबाजूंनी टीका झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT