Sambhaji Bhide News Saam Tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide News: संभाजी भिडेंचा पुतळा उलटा टांगला, लाथा घातल्या; सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Solapur News: संभाजी भिडेंचा पुतळा उलटा टांगला, लाथा घातल्या; सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

साम टिव्ही ब्युरो

>> विश्वभूषण लिमये

Sambhaji Bhide News: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर संभाजी भिडे यांच्या विरोधात विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांच्या वतीने राज्यभरात भिडे यांचा निषेध केला जात आहे.

यातच आज सोलापूर येथील मोहोळ राष्ट्रवादीकडून भिडे गुरुजीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलट टांगून निषेधार्थ फाशी देण्यात आली. तसेच राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी भिडे गुरुजींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लाथा घातल्या.

यासोबतच भिडे गुरुजींच्या उलट्या लटकावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याच्या शहरभर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात भिडे गुरुजींवर गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीने निवेदन देण्यात आले. (Latest Marathi News)

भिडे यांनी अमरावती येथे केलेल्या गांधी कुटुंबावरील वक्तव्याचा निषेधार्थ सातारा काँग्रेस कडून रस्ता रोको

अमरावती येथे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी आणि त्यांचा वडिलांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ सातारा काँग्रेसच्या वतीने सातारा काँग्रेस भवन येथे रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात घोषणबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

संभाजी भिडे यांना वयानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे: आमदार संजय गायकवाड

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. तर संभाजी भिडे यांचं वयानुसार स्मृतिभ्रंश झाला आहे. त्यामुळे ते असं विधान करत असल्याची टीका बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

First Metro: जगातील पहिली मेट्रो कधी आणि कुठे सुरू झाली? जाणून घ्या रंजक इतिहास

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

जुना वाद जिवावर उठला! ५ जणांनी अल्पवयीन मुलाच्या अंगावर टेम्पो घातला; रस्त्यावर चिरडून मारलं

Bogus Doctor : बोगस डॉक्टरांचे पितळ उघडे; पदवी नसताना रुग्ण तपासणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Government Apps: आता मोबाईलवर मिळणार सरकारी सेवा; फक्त एका क्लिकमध्ये, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT