Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी नाणारला विरोध करुन पाकिस्तानला मदत केली? आशिष शेलारांचा गंभीर आरोप

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून सरळ सरळ पाकिस्तान मदत केली, असा गंभीर आरोप आशिष शेलारांनी केला आहे.
Ashish Shelar and uddhav Thackeray
Ashish Shelar and uddhav Thackeray saam tv
Published On

Ashish Shelar News: भाजप नेते आशिष शेलार यांनी नाणार प्रकल्पावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करून सरळ सरळ पाकिस्तान मदत केली, असा गंभीर आरोप आशिष शेलारांनी केला आहे. (Latest Marathi News)

आशिष शेलार म्हणाले, 'कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे'.

'१० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान व सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी एका वर्तमानपत्रात आली आहे. म्हणजे गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Ashish Shelar and uddhav Thackeray
PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याला 'India' फ्रंटचा विरोध, काळे झेंडे दाखवून करणार निषेध

'प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात, त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.

Ashish Shelar and uddhav Thackeray
Sujay Vikhe-Patil News: विरोधकांंनी लोक सांभाळण्यासाठी 'इंडिया' नावाचा फड उभा केलाय; सुजय विखे पाटील यांची टीका

दरम्यान, आशिष शेलार यांच्या आरोपानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ' उद्धव ठाकरे यांची एवढी ताकत असेल की एखादा प्रकल्प ते पाकिस्तानलाही पाठवू शकतात, याची आशिष शेलारांनी दखल घ्यावी, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com