samaj kalyan vibhag adhikari hits student video viral in kolhapur Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur : अजून किती हेलपाटे मारावे लागणार, विद्यार्थ्यास समाज कल्याण विभागात धक्काबुक्की ? व्हिडिओ व्हायरल

या योजनेची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना कधी मिळणार ? अजून किती हेलपाटे मारावे लागणार ? असे बोलत असताना एका अधिका-याने त्याला चित्रीकरण करण्यास विरोध केला.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापूर येथील विचार माळेमधील समाज कल्याण विभागातील एका अधिका-याकडून विद्यार्थ्याला धक्काबुक्की केल्याचा आराेप हाेऊ लागला आहे. या अधिका-याची चाैकशी करुन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी विद्यार्थी करु लागलेत. दरम्यान हेलपाटे मारूनही न्याय मिळत नसल्याने संबंधित विद्यार्थी त्याच्यावर मोबाईलवर समाजकल्याण विभागात चित्रीकरण करत असताना हा प्रकार घडला असून संबंधित घटना समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे. (Maharashtra News)

'लॉ'चेे शिक्षण घेणारा एक विद्यार्थी हा शिष्यवृत्ती कधी मिळणार याची माहिती घेण्यासाठी समाज कल्याण विभागात गेले 8 दिवस फेऱ्या मारत होता. त्याने या कार्यालयातील एका अधिका-याकडे शिष्यवृत्ती केव्हा येणार याची चौकशी केली. त्यास उडवाउडवीची उत्तर देण्यात आले.

गेले 8 दिवस चौकशी करून विद्यार्थ्याला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्याने कार्यालयात सन 2021 पासून शिष्यवृत्ती न जमा झालेने समाज कल्याण विभाग काय करते असा जाब विचारत थेट मोबाईलवर चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या योजनेची शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना कधी मिळणार ? अजून किती हेलपाटे मारावे लागणार ? असे बोलत असताना एका अधिका-याने त्याला चित्रीकरण करण्यास विरोध केला. यावेळी अधिका-याने आपल्याला धक्काबूकी केल्याचे म्हटले. तसेच अपमानास्पद वागणुक देत मोबाईल काढून घेण्याचाही प्रयत्न केला. हा सर्व प्रकार मोबाईल व्हिडिओमध्ये चित्रित झालेला आहे. हा व्हिडिओ विद्यार्थ्याने समाज माध्यमात पाेस्ट केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

Face Care: चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्याने चेहरा फक्त ग्लो होत नाही तर 'हे' त्रासही होतात कायमचे दूर

ज्ञान पाजळणाऱ्या पुणेकरांना परदेशी नागरिकानं शिकवला धडा|VIDEO

माझ्या बायकोला घरी पाठवा हो....सासूच्या पायावर लोटांगण घालून जावई धायमोकळून रडू लागला, Viral Video बघून काय म्हणाल?

SCROLL FOR NEXT