हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळावरुन भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि धैर्याला सलामी! SaamTvNews
महाराष्ट्र

हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळावरुन भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि धैर्याला सलामी!

भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि धैर्याला आज सलामी देण्यात आली. यावेळी माजी सैनिकांसह महिलांचाही सहभाग पहायला मिळाला.

रोहिदास गाडगे

खेड : देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढणाऱ्या, आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या (Indian Army) शौर्याला आणि धैर्याला आज भारतीय सैन्य दिनानिमित्ताने क्रांतीकारक हुतात्मा राजगुरुंच्या जन्मस्थळावरुन सलामी देण्यात आली. यावेळी माजी सैनिक दलाची नववर्षाची दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

हे देखील पहा :

क्रांतीकारक हुतात्मा राजगुरु वाड्याला क्रांतीचा वारसा आहे आज भारतीय सैन्य दलाने क्रांतीचा वारसा जतन करत भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि धैर्याला आज सलामी देण्यात आली यावेळी माजी सैनिकांसह महिलांचाही सहभाग पहायला मिळाला.

यावेळी हुतात्मा राजगुरु जन्मस्थळावर १९०६ ते १९४७ पर्यतच्या स्वतंत्र लढ्यात वापरण्यात आलेले राष्ट्रध्वज राजगुरुवाड्यावर उभारण्यात आले असुन यासाठी हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी स्वखर्चातून स्वातंत्र्य (Independence) काळातील स्वातंत्र्याच्या लढ्यातील वैभव उभे राहिले आहे. यासाठी खेड तालुक्यातील माजी सैनिकांचे मोलाचे योगदान मिळाले आहे.

भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि धैर्याला सलामी सोहळ्याला हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, बाळासाहेब कहाणे, नरेंद्र गायकवाड, विठ्ठल पाचारणे, माजी सैनिक संतोष भोगाडे, तान्हाजी टोपे, चंद्रशेखर जाधव, कैलास गारगोटे उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT