Nagpur News  Saam TV
महाराष्ट्र

Nagpur: अशुद्ध बर्फाची सर्रास विक्री?, नागपूरकरांच्या आरोग्याला धोका

संजय डाफ

नागपूर: विदर्भात उष्णतेची लाट सुरु झाली आहे. तापमान ४२ च्या वर गेलं आहे. त्यामुळे प्रखर उन्हात दिलासा म्हणून लोकांना शितपेय पिण्याकडे कल वाढत आहे. मात्र, काही भेसळखोर याचा गैरफायदा घेतात. उन्हाळा आला की अखाद्य बर्फाची विक्री, शितपेय्यात भेसळ, अशुद्ध पाण्याची विक्री याचा सर्रास वापर होतो. भेसळखोरीमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे याला आळा बसावा आणि भेसळखोरांच्या मुसक्या आवळल्या जाव्य, म्हणुन अन्न विभाग नागपूरात (Nagpur) एक विशेष मोहिम राबवणार आहे.

एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या या मोहिमेत, अन्न पदार्थाची तपासणी केली जाणार आहे. भेसळखोर किंवा अखाद्य बर्फाची विक्री करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार, अशी माहिती अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश अन्नापुरे यांनी दिली आहे. उन्हाळयात बर्फ गोळा, आईसक्रीम, लस्सी या पदार्थांची मागणी वाढत असते. याचाच फायदा घेऊन निकृष्ट दर्जाच्या अखाद्य बर्फाची विक्री करणे, किंवा भेसळ करणायाचं प्रमाण वाढतं. याला आळा बसावा म्हणून अन्न विभागाकडून एक स्पेशल मोहिम राबवण्यात येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

SCROLL FOR NEXT