Sakshi Maharaj  Saam TV
महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वरमध्ये अपेक्षित तेवढा विकास झाला नाही : साक्षी महाराज

साक्षी महाराजांनी नाशिकमध्ये संस्कृत विद्यालय झालं पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली.

अभिजीत सोनावणे

नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्ये ( Trimbakeshwar ) अपेक्षित तेवढा विकास झाला नाही. विकास करणे स्थानिक सरकारची जबाबदारी असते. जेवढं मोठं इथल्या मोठं इथल्या सरकारच नाव आहे,तेवढं मोठं काम देखील हवं मात्र मी इथं सगळीकडे फिरलो तेव्हा लक्षात आले की कुठल्या दिशेने प्रगती होत आहे,असे मत भाजप खासदार साक्षी महाराज (Sakshi Maharaj ) यांनी त्र्यंबकेश्वरच्या विकासावर व्यक्त केलं. साक्षी महाराज नाशिक (Nashik ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी साक्षी महाराज पत्रकारांशी बोलत होते. ( sakshi maharaj latest News )

हे देखील पाहा -

साक्षी महाराज पुढे म्हणाले,'त्र्यंबकेश्वरच्या विकासाबाबत पर्यटन विभागाकडे आग्रह केला पाहिजे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने ज्या ज्या संभावना असेल,त्या त्या इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करून त्यांच्या मागणीनुसार संस्कृती विभाग या ठिकाणी निर्णय घेऊन काही चांगल्यातले चांगले करेल,जे की आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरेल'

संस्कृत विद्यालयासाठी केंद्राशी चर्चा करणार

साक्षी महाराजांनी नाशिकमध्ये संस्कृत विद्यालय झालं पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली. संस्कृत विद्यालयाबाबतीत बोलताना साक्षी महाराज म्हणाले,'नाशिक आणि त्र्यंबकेश्वर फार मोठं तीर्थ क्षेत्र आहे,त्यामुळे येथे संस्कृत विद्यालय नसणं मोठी दुःखाची गोष्ट असून आश्चर्य जनक आहे.मला अस वाटतं इथं संस्कृत विद्यालय नव्हे तर संस्कृत विश्व विद्यालय बनलं पाहिजे'.

विश्व विद्यालयावर भाष्य करताना म्हणाले,'त्र्यंबकेश्वर येथे संस्कृत विश्व विद्यालय व्हावे यासाठी महंत अनिकेत शास्त्री महाराज आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी भेट घेऊन आम्ही जमीन देण्यासाठी तयार असून आपण यासाठी प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार यांना तयार करा. त्र्यंबकेश्वर देवाच्या नावाने येथे संस्कृत विश्व विद्यालय बनावं यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान कमिटी कडून देखील पत्र देण्यात आले आहे. यासाठी मी केंद्र सरकारशी चर्चा करणार आहे, असंही साक्षी महाराज म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT