"संभाजीराजेंना सन्मान देण्याची वेळ येते; तेव्हा शिवसेनेचा हात का आखडतो ?"

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेच्या उमेदवारीवर भाजप नेते आशिष शेलार ( ashish shelar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
sambhajiraje chhatrapati
sambhajiraje chhatrapati Saam Tv

सचिन आगरवाल

अहमदनगर : राज्यसेभच्या उमेदवारीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यसभेच्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना आणि महाविकास आघाडीकडून मदतीची अपेक्षा होती. परंतु शिवसेनेनं ( Shivsena ) संभाजीराजेंना डावलत राज्यसभेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीनं संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje ) यांना राज्यसभेच्या जागेसाठी मदत केली नाही, म्हणून संभाजीराजे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर भाजप नेते आशिष शेलार ( ashish shelar ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ashish Shelar Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

भाजप नेते आशिष शेलार हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील भाजपच्या मार्गदर्शन कार्यक्रमात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलतना त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर भाष्य केलं. शेलार म्हणाले,'शिवसेनेनं कोणाला उमेदवारी द्यावी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. मुद्दा आहे की संभाजीराजे छत्रपती यांना जेव्हा सन्मानाने देण्याची वेळ येते तेव्हा शिवसेनेचा हात आखडता का होतो.स्वपक्षाच्या विचारांसाठी संकुचित का होतो,तसंच हात आखडता घेतला, त्यांनी संकुचितता दाखवली हा काही छत्रपतींचा आदर केलाय असं मी मानत नाही'.

आशिष शेलार यांनी यावेळी राज्यातील ओबीसी आरक्षणावरही प्रतिक्रिया दिली. 'ओबीसी आरक्षण मिळूच नये हीच भावना महविकास आघाडीची आहे.मध्य प्रदेशने पाठपुरावा केला,कायदेशीर सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. मध्य प्रदेशने जे केलं ते करताना ठाकरे सरकारचे हात शिवले होते का ?, असा सवाल शेलार यांनी ठाकरे सरकारला केला. ओबीसी आरक्षणावरून आमचा मोर्चा हा जन आक्रोश आहे.या आक्रोशाचा प्रतिबिंब म्हणजे हा मोर्चा होता.आम्ही हा संघर्ष दुप्पट करू, असंही आशिष शेलार म्हणाले.

sambhajiraje chhatrapati
OBC Reservation : सत्ता असताना तुम्ही झोपला होता का ?; शरद पवारांचा फडणवीसांवर घणाघात

आशिष शेलारांची ओबीसी आरक्षणावरून पवारांवर टीका

आशिष शेलार यांनी यावेळी शरद पवारांवर देखील टीकास्त्र सोडलं. शेलार म्हणाले, 'जो पर्यंत केंद्रात भाजपचं सरकार आहे. तो पर्यंत ओबीसींना आरक्षण मिळू शकणार नाही असं शरद पवार म्हणाले होते'. यावर शेलार म्हणाले, 'मध्य प्रदेशमध्ये पवार साहेबांना बघता येत नाही का, मध्य प्रदेश काय पाकिस्तान मध्ये आहे का ?, पवार साहेबांच्या दृष्टीने, जे तुम्ही करू शकला नाहीत ते दुसऱ्याने करून दाखवलं. त्यामुळे जळफळाट होतोय. त्यामुळं खोटी विधाने करू नका, अशा शब्दात शेलार यांनी शरद पवारांच्या विधानावर उत्तर दिलं.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com