parbhani saam tv
महाराष्ट्र

Parbhani Maratha Andolan : परभणीत मराठा आंदाेलक आक्रमक, पूर्णा तहसील कार्यालयास लावली आग

आज अचानक झालेल्या आंदाेलनामुळे प्रशासकीय कर्मचारी गाेंधळून गेले.

राजेश काटकर

Parbhani News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आठवड्यापासून आंदाेलन सुरु आहे. काही जिल्ह्यांत आंदाेलनास हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे. आज (बुधवार) परभणी (parbhani maratha andolan) जिल्ह्यातील पूर्णा तहसील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न काहींनी केल्याचे समाेर आले. (Maharashtra News)

परभणी जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी मराठा आंदोलनकर्त्यांनी भिंतीवरून उडी मारून तहसील कार्यालयात प्रवेश केला हाेता. तेथेच आंदाेलनकर्त्यांनी घोषणाबाजीर करत थेट तहसीलदार यांच्या वाहनास लक्ष्य केले. यावेळी आंदाेलनकर्त्या युवकाने तहसीलदारांच्या वाहनाच्या काचा फाेडल्या. त्यामुळे वाहनाचे माेठे नुकसान झाले.

दरम्यान आज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही युवकांनी घोषणाबाजी करत पूर्णा तहसील कार्यालयात आंदाेलन केले. यावेळी काही आंदाेलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात पेट्रोल टाकून कार्यालयास आग लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अग्निशमन दलाने काही वेळातच कार्यालय परिसरात लागलेली आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी हानी टळली. त्यानंतर या परिसरात राज्य सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे हिंगोलीत जोरदार निदर्शने

Breathing Problems : नाक बंद झालय? श्वास घ्यायला त्रास होतोय? तर घरच्या घरी करा 'हे' सोपे उपाय

Auto Tips : बाईक कमी मायलेज देतेय? 'हे' ५ बदल केल्याने होईल पेट्रोलची बचत

Blood Pressure : बीट की डाळिंब? BP नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता ज्यूस फायदेशीर

Vitamin B12 deficiency: शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास हातांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

SCROLL FOR NEXT