sakal maratha samaj andolan at vaijapur kannad road  saam tv
महाराष्ट्र

Maratha Samaj Rasta Roko Andolan : एक मराठा लाख मराठा... वैजापूर कन्नड मार्गावर रास्ता राेकाे, वाहतुक विस्कळीत

Manoj Jarange Patil : मनाेज जरांगे पाटील यांच्या आंदाेलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांनी पाणी अन्न आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलेला आहे.

Siddharth Latkar

- रामू ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

एक मराठा लाख मराठा या घोषणा देत आज (बुधवार) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कन्नड मार्गावर मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदाेलन (rasta roko at vaijapur kannad road) करण्यात आले. या आंदाेलनामुळे वैजापूर कन्नड मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारने काढलेल्या अधिसूचनेच कायद्यात रूपांतर करावं यासाठी मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) हे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदाेलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांनी पाणी अन्न आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. सोबतच मराठा समाज बांधवांकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर कन्नड मार्गावर औरळा फाट्यावर आज (बुधवार) सकल मराठा समाज बांधवांकडून रास्ता रोको करण्यात आला. या परिसरातील नागरिकांनी या रास्ता रोको मध्ये सहभागी घेतला. (Maharashtra News)

आंदाेलकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:अण्णा हजारे उपचारासाठी मुंबईला हलवले

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT