Sakal Election Survey Saam Tv
महाराष्ट्र

Sakal Election Survey: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? पसंती कुणाला? सकाळ-सामच्या सर्व्हेत आश्चर्याचा धक्का देणारं नाव आलं समोर

Sakal Vidhan Sabha Election Survey News: आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकाळ समूह आणि साम टीव्हीनं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा खुलासा करण्यात आलाय. विधानसभेच्या निवडणुकीवर करण्यात आलेला सर्व्हे हा पहिला सर्व्हे आहे.

Bharat Jadhav

लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल लागल्यानंतर सर्वांचं लक्ष विधानसभेकडे लागले आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेचा निकाल लागेल असा, अंदाज वर्तवला जात आहे. नागरिकांनी आपला कल देत देशात मोदी सरकार ऐवजी एनडीएचं सरकार आणलं. आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. आता राज्यात कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार यावर तर्क काढले जात आहेत.

आता राज्यात कोणाचं सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान सकाळ समूह आणि साम टीव्हीनं विधानसभा निवडणुकीचा सर्व्हे केलाय. राज्यातील नवा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत धक्कादायक खुलासा यात झालाय. विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाला कौल मिळेल यावर सकाळ समुहाने सर्व्हे केला आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर सकाळ समुहाने हा सर्व्हे केलाय. त्यामुळे या योजनेचा यावर परिणाम झाला हे सुद्धा यातून समोर आले आहे.

उद्धव ठाकरे यांना इतकी पसंती का?या प्रश्नावर बोलतांना सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस म्हणाले, कोविड काळात उद्धव ठाकरेंनी केलेल्या कामाची ही पोच पावती आहे. वर्ष २०१९ ते २०२२ मध्ये कोविड काळात उत्तम प्रकारे काम केले आहे. त्यानंतर त्यांनी एक विकटीम कार्ड खेळलं. त्यानंतर एक वर्षाच्या आजारपणातून बाहेर येत त्यांनी बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर सातत्याने केलेला हल्लाबोल. यामुळे उद्धव ठाकरे लोकांच्या मनात कायम राहिले. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मागील ५ वर्षापूर्वीची मुख्यमंत्री म्हणून केलेली कारकीर्द पाहता त्यांना पसंती २२ टक्के लोकांनी दिलीय.

सर्वेक्षणासाठी संमिश्र संशोधन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. राज्यभरातून २८८ विधानसभा मतदारसंघातून ८४५२९ मतदारांशी संवाद साधला. त्यासाठी सकाळचे दोन हजारांवर सहकारी सहभागी झाले होते. मतदारांची निवड करतांना ४८ लोकसभा मतदारसंघांना २८८ विधानसभा मतदारसंघात विभागण्यात आले. शहरी आणि ग्रामीण भागांची प्रभाग आणि जिल्हा परिषद गट अशी विभागणी करण्यात आली. भौगोलिक समतोल राखून संशोधन नमुने निवडण्यात आलेत. हा सर्व्हे करण्यासाठी स्तरीय यादृच्छिक नमुना (Stratified Random Sampling) संशोधन पद्धत वापरण्यात आली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाच्या सखोल विश्लेषणासाठी उद्याचा 'सकाळ' वाचा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT