Mohol Vidhansabha Constituency Saam Tv
महाराष्ट्र

SAAM Exit Poll: मोहोळमध्ये यशवंत माने होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Mohol Vidhansabha Constituency, Exit Poll Maharashtra : मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये यशवंत माने हे संभाव्य आमदार होऊ शकतात. यशवंत माने हे राजू खरे यांचा पराभव करू शकतात.

Priya More

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यशवंत माने यांनी निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यामध्ये तगडी फाइट झाली.

सकाळ एक्झिट पोलनुसार, मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये यशवंत माने हे संभाव्य आमदार होऊ शकतात. यशवंत माने हे राजू खरे यांचा पराभव करू शकतात. त्यामुळे या मतदारसंघामध्ये अजित पवार गटाला मोठे यश मिळू शकते. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून रमेश कदम यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले. पण अर्ज भरण्यापूर्वी शरद पवार गटाने राजू खरे यांना नवीन उमेदवारी दिली.

तर, यशवंत माने यांची ५ वर्षांची कामगिरी खूप चांगली राहिली. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक लीड दिला होता. त्यामुळे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजेल असे म्हटले जात होते. पण आता या मतदारसंघामध्ये यशवंत माने हे पुन्हा एकदा बाजी मारणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT