Sai Baba devotee rishabh lohia
Sai Baba devotee rishabh lohia मोबीन खान
महाराष्ट्र

Sai Baba Shirdi : साईंमध्ये कृष्ण दिसतात; भक्ताने अर्पण केली पाच लाखांची सोन्याची बासरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मोबीन खान, शिर्डी

नाशिक: "सबका मालिक एक" आणि "श्रद्धा सबुरी"चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबाचरणी (Sai Baba) भक्त आपल्या कुवतीप्रमाणे आणि श्रद्धेनुसार दान करत असतात. साईबाबांनी शिर्डीतील मशिदीत राहून सर्वधर्म समभावाची शिकवण देत मशिदीला द्वाराकामाई म्हटले. त्यामुळे, अनेक भक्त साईबाबांना श्रीकृष्णाच्या रुपातही बघतात. याच शिर्डीतील (Shirdi) द्वारकाधीशाला दिल्लीचे ऋषभ लोहिया यांनी सुमारे 4 लाख 85 हजार 757 किंमत असलेली 100 ग्राम वजन असलेली सोन्याची बासरी अर्पण केली आहे. (Sai Baba Shirdi Latest News)

हे देखील पाहा -

बासरीची पाच लाख किंमत

जवळपास पाच लाख किंमत असलेल्या या बासरीवर सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले असून एका टोकाला सोन्याचे दोन दोर (साखळी) ही लावण्यात आली आहे. ऋषभ लोहिया यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काही दिवस आधीच ही बहुमल्य भेट साईचरणी अर्पण केली आहे. दरवर्षी गोकुळ अष्टमीला साई मंदिरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती ठेवत जन्मोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात ही सोन्याची बासरी आकर्षण ठरणार आहे.

साईबाबा श्री कृष्णाच्या रुपात दिसतात म्हणून दिली बासरी

साईबाबांना भक्त विविध रुपात बघतात. शिर्डी हे द्वारके समान आणि साईबाबा हे कृष्णाचा अवतार समजून अनेक भक्त शिर्डीला साई दर्शनासाठी गर्दी करत असतात. दिल्लीचे रहिवासी असलेले साईभक्त ऋषभ लोहिया यांनी आज आपल्या कुटुबीयांसमवेत शिर्डीला येवून 100 ग्राम वजन असलेली सोन्याची बासरी दान म्हणून दिली आहे. शिर्डीत द्वारकामाईत साईबाबांनी आपले जीवन व्यतीत केलं. साई आम्हाला श्रीकृष्णाच्या रुपात दिसतात. त्यामुळे, श्री कृष्णाची आवडती बासरी आम्ही साईंना अर्पण केल्याचे ऋषभ लोहिया यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon: खुशखबर! आज सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मान्सून

Today's Marathi News Live: बीडमध्ये तिहेरी अपघातात; 1 ठार तर 3 जण जखमी

Solapur News : दुष्काळामुळे सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योग अडचणीत; शेतकरीही चिंतेत 

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT