जम्मू-काश्मीर: स्वातंत्र्य दिनापूर्वी दहशतवाद्यांचा एक मोठा कट लष्कराने उधळला आहे. जम्मूच्या (Jammu) परगलमध्ये उरी हल्ल्यासारखा (Terror Attack) लांनी हाणून पाडला आहे. लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे. मात्र, या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. (terror attack in jammu and kashmir)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीतील दरहल भागातील परगलमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीच्या घुसण्याचा प्रयत्न केला. यावर सतर्क जवानांनी संशयितांना पाहताच गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. तर तीन जवान शहीद झाले आहेत. सध्या शोधमोहीम सुरू आहे. एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, दारहाल पोलिस स्टेशनपासून 6 किमी दूर असलेल्या इतर तुकड्यांनाही छावणीकडे पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
2016 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 19 जवान शहीद झाले होते, तर सुमारे 30 जवान जखमी झाले. मात्र, प्रत्युत्तरादाखल चारही दहशतवादी ठार झाले. त्याचवेळी भारताने पीओकेमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकही केला होता. यावेळी दहशतवाद्यांचे लाँच पॅड उद्ध्वस्त करण्यात आले होते.
बुधवारी मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात सुमारे 12 तास चाललेल्या ऑपरेशनमध्ये लतीफ रादरसह लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले. काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहुल भट आणि काश्मिरी अभिनेत्री अमरीन भट यांच्यासह अनेक नागरिकांच्या हत्येत लतीफ राथेरचा सहभाग होता. अन्य दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सुरक्षा दलांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. काश्मीर झोनचे एडीजीपी विजय कुमार यांनी लतीफचा खात्मा हे सुरक्षा दलांचे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. (3 Soldiers Killed In Action In J&K Army Camp Attack, 2 Terrorists Shot Dead)
दुसरीकडे, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी 30 किलो IED (स्फोटकं) जप्त करून स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. सर्क्युलर मार्गावरील तहब क्रॉसिंगजवळ हा आयईडी बसवण्यात आला होता, नंतर बॉम्बशोधक पथकाला पाचारण करून तो नष्ट करण्यात आला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आर्मी रोड ओपनिंग पार्टीच्या सैनिकांनी परिसरात गस्त घालत असताना रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद वस्तू दिसली. यावेळी त्यांनी तत्काळ जम्मू-काश्मीर पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी पोहोचले आणि बॉम्ब निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. नंतर हा आयईडी निष्क्रिय करण्यात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.