महाराष्ट्र

Sahitya Sammelan 2024 : अखेर साहित्य संमेलनाचे ठिकाण ठरले; तब्बल ७० वर्षांनी दिल्लीत घुमणार मराठी भाषेचा आवाज

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे.

Satish Daud

यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नेमके कोणत्या ठिकाणी होणार, याची अनेकांना उत्सुकता लागून होती. याबाबत अनेक चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून 98 वे साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 70 वर्षांनंतर राजधानी दिल्लीत मराठी भाषेचा आवाज घुमणार आहे.

त्यामुळे या साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जाणार का? हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (Sahitya Sammelan 2024) जवळपास 8 ठिकाणाहून निमंत्रण प्राप्ती झाली होती. यानंतर साहित्य संमेलनाच्या निवड या ठिकाणांना भेट दिली.

फेब्रुवारीमध्ये झालेले यंदाचे संमेलन अमळनेर येथे झाल्याने धुळ्याचा पर्याय बाद करण्यात आला. तसेच औंध आणि औंदुबर ही दोन्ही ठिकाणे लहान असल्याचे कारण देत त्यांना नासपंती देण्यात आली. अशा प्रकारे धुळे, औंध आणि औंदुबर या तीनही संमेलनस्थळांना बाद करण्यात आले.

त्यामुळे साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्ली (Delhi), मुंबई आणि इंचलकरंजी हे 3 ठिकाण बाकी होते. आज यावर मुंबई येथील मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयात महत्वाची बैठक झाली. या बैठकीत निवड समितीने आगामी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीतच घेण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

त्यामुळे आता तब्बल 70 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. यापूर्वी 1954 साली लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. दरम्यान, मुंबईतही गेल्या 25 वर्षांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न झालेले नाही. त्यामुळे यावर मुंबईकरही नाराज झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT