साहित्य संमेलन Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : साहित्य संमलेनाचे विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन

ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर हे उपस्थिती लावणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक मध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार याची उत्सुकता अखेर संपली असून, प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार असून यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर हे उपस्थिती लावणार आहेत.

3 ते 5 डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटीमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. गोदावरी तीरी होऊ घातलेल्या आणि मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी तथा लेखक कुसुमाग्रज यांच्या नगरीत हे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून खगोल शास्त्रज्ञ व लेखक यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळालेला आहे.

या साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकात होणाऱ्या यंदाच्या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरु आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT