Shreya Maskar
पावसाळ्यात आपल्याला संध्याकाळी काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. अशावेळी बाहेरचे जंक फूड खाण्यापेक्षा घरीच स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की चाट बनवा. झटपट होणारी रेसिपी आताच नोट करा.
आलू टिक्की चाट बनवण्यासाठी बटाटे, मक्याचे पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हिरव्या मिरच्या, तेल, कोथिंबीर, दही, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, शेव, डाळिंबाचे दाणे, कोथिंबीर आणि मसाले (लाल तिखट, जिऱ्याची पूड, आमचूर पूड, चाट मसाला, काळे मीठ) इत्यादी साहित्य लागते.
आलू टिक्की चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे सोलून किसून घ्या. किसल्यामुळे टिक्कीमध्ये गुठळ्या होणार नाहीत.
आता टिक्की बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि सुके मसाले घालून मिक्स करा. यात उकडलेला बटाटा टाकून पीठ मळून घ्या.
हातांना थोडे तेल लावून मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे बनवा. तळहातांमध्ये दाबून त्यांना चपटे करून पॅटीज बनवा. त्यांच्या कडा गुळगुळीत करा, म्हणजे तळताना त्या फाटणार नाहीत.
एका नॉन-स्टिक पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करा. टिक्की पॅनवर ठेवून मध्यम आचेवर तळा. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.
तयार गरम टिक्की एका प्लेटमध्ये काढून हलक्या हाताने ती तोडा. त्यावर थंड, गोड दही घाला. नंतर हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी घाला.
टिक्कीवर चिमूटभर चाट मसाला, काळे मीठ, भाजलेले जिरे आणि लाल तिखट भुरभुरा. शेवटी, बारीक चिरलेली शेव, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर घालून सजवा आणि लगेच सर्व्ह करा.