Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg : सावधान! समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय; अपघातांचं नवं कारण आलं समोर?

Reasons Behind Samruddhi Mahamarg Accidents: समृद्धी महामार्गावरही अतिक्रमण, अनधिकृत फूड स्टॉल्समुळे समृद्धीची सुरक्षा धोक्यात.

संजय जाधव

Samruddhi Mahamarg Latest News : मोठा गाजावाजा करत नागपूर - मुंबई असा ७०१ किमीचा ग्रीनफिल्ड सुपर एक्स्प्रेस कॉरिडॉर बनविण्यात आला. त्याचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी सुरू ही करण्यात आला. सुरुवातीला सांगण्यात आलं की महामार्ग अतिशय वेगवान वाहनांसाठी एक्सेस कंट्रोल असा असेल मात्र आता याच माहामार्गाची सुरक्षा कशी धोक्यात आली आहे ते समोर आलं आहे.

समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करताना कुठेही महामार्गावर वाहन थांबवता येत नाही कारण, थांबलेल्या वाहनांवर मागून येणाऱ्या भरधाव वाहनांचा अपघात होऊ शकतो असा नियम असताना देखील या महामार्गावर अनेक ठिकाणी अनधिकृत रित्या हॉटेल्स आणि फूड स्टॉल्स सुरू केले आहेत.

त्यामुळे महामार्गावर ट्रक, कार थांबून या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील वाहतुकीसाठी अडथळा ठरत असल्याचं चित्र मेहकर जवळील डोनगाव पेट्रोल पंप परिसरात दिसत आहे. वेगवान महामार्गावर थांबलेल्या वाहनांवर धडकल्याने गेल्या आठवड्यात एक मोठा अपघात (Accident) झाला होता.

मात्र तरीही रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नासल्याच समोर आलं आहे. विशेष म्हणजे हे फूड स्टॉल्स महामार्गाच्या सुरक्षा भिंतीच्या आत असल्याने याठिकाणी अनेक वाहने थांबत असतात आणि अशा वाहनांवर मागून येणारी भरधाव वाहने धडकून मोठा व गंभीर अपघात होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांनाही म्हटलो मी इकडे आलो, तुमचं तिकडे काय काम ? - रामदास आठवले

Deepika- Ranveer Daughter Dua: लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच स्पॉट झाले दीपिका अन् रणवीर; एअरपोर्टवरचा VIDEO व्हायरल

VIDEO : मोदींच्या प्रचाराचा नारळ धुळ्यात का फुटला? फडणवीसांनी सांगितलं कारण | Marathi News

Winter Season: हिवाळ्यात निरोगी आरोग्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

Gita Jain : अपक्ष म्हणून धाकधूक नाही, पण तिकीट नाकारल्याची खंत; गीता जैन यांची सडेतोड टीका

SCROLL FOR NEXT