Sadhus gather ahead of the Kumbh Mela in Nashik amid rising controversy over demands for weapon licenses. saam tv
महाराष्ट्र

कुंभमेळ्यातील साधूंना हवेत शस्त्र परवाने, साधूंच्या तोंडी शास्त्र आणि हाती शस्त्र?

Sadhus Demand Weapon Licenses Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंना शस्त्र परवाने द्या, अशी मागणी आता समोर येऊ लागलीय..मात्र कुंभमेळ्यात साधूंना शस्त्र का आणायची आहेत? साधूंना नेमकी कोणाची भीती आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

नाशिकमध्ये होणारा आगमी सिंहस्थ कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी वेगवेगळ्या मुद्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्यात आता साधू महतांच्या आखाड्यांनी केलेल्या मागणीनं पोलिसही चक्रावून गेलेत. कारण या कुंभमेळ्यात साधू महंतांच्या हाती शंख नव्हे तर शस्त्र दिसल्यावर दचकू नका. भस्माच्या ऐवजी हे साधू महंत बंदुका घेऊन शाही स्नान करणार का असा सवाल उपस्थि झालाय. कारण या साधू महंतांनी केलेली ही विचित्र मागणी...

साधूंना का हवेत शस्त्र परवाने

साधू महंताच्या आखाड्यांनी मागितले शस्त्र परवाने

आतापर्यंत 10 साधुमहंतांचे परवान्यासाठी अर्ज

आखाड्यांची संपत्ती आणि सुरक्षेसाठी शस्त्र परवान्याची मागणी

साधू महंतांच्या या मागणीला मात्र आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे अध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराजांनी कडाडून विरोध करत या साधू महंतांच्या हेतूवरच शंका घेतलीये.

नाशकात दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून सनातन धर्माचा हा महाकुंभ भरतो. इथे होणाऱ्या शाही स्नानासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये येतात. याच कुंभमेळ्यासाठी २४ तास सशस्त्र २५ ते ३० हजार पोलिसांची फौज तयार ठेवण्याची प्रशासनाची तयारी आहे. तसंच सुरक्षेसाठी एआयचा वापर करत अचूक व्यवस्थापन ठेवण्यात येणारेय. सोबत शहरभरात सीसीटिव्ही ड्रोनची करडी नजर असतांनाही या साधू महतांनी थेट शस्त्र मागितल्यानं त्यांचा प्रशासनावर विश्वास नाही का असाही सवाल उपस्थित होतोय. आता पोलिस या साधू संताच्या मागणीची दखल घेतात का हे पाहणं महत्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मोदींना मंत्रिमंडळात फडणवीस हवेत'; मोदी-फडणवीस भेटीनंतर राऊतांचा दावा

Pune Roads Pothole: खड्ड्यांनी घेतला शाळकरी मुलाचा जीव; वडिलांसोबत ट्युशनला जाताना घडली दुर्घटना

महाराष्ट्रात 2 कोटी मतदार वगळणार? 'अल्पसंख्यांकांना टार्गेट करण्यासाठी SIR' , वडेट्वीवारांचा आरोप

Delhi : दिल्लीतील दिग्गज नेत्यासह ६ जणांना अटक; माजी CEO आणि IAS अधिकाऱ्याचाही समावेश, एसीबीची सर्वात मोठी कारवाई

Kumbh Mela Tender Scam: जळगावात कुंभमेळा बोगस टेंडरचा छापखाना; बिंग कसं फुटलं? घोटाळ्याची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT