मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीमध्ये अद्याप खलबतं सुरू आहेत. त्यातच आता मंत्रिमंडळाबाबतची नाराजी समोर येत आहे. महायुतीमधील सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांना पहिले स्थान द्या. मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आली आहे. जर पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवारांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. शरद पवार यांनी ईव्हीएमचं आंदोलन करून काही फायदा होणार नाही. शरद पवार नेहमी गाव खेड्यांमध्ये राजकारण करतात. असं म्हणत त्यांनी निशाणा साधला.
भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुतीवर सडकून टीका केली. 'लोकसभेला एकनाथ शिंदे, विधानसभेला एकनाथ शिंदे आम्हीही महायुतीचं काम केलं आहे. घटक पक्षाचा विचार महायुतीतील मोठ्या पक्षाने करावा. मंत्रिमंडळ विस्तार करताना आधी घटक पक्षांसाठी जागा बाजूला काढाव्यात. पंचायत समित्या, नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आम्ही दोन वेळेस महायुतीच्या मोठ्या पक्षांचा पेरा फेडला आहे. बैल विकला तर काय होईल? याचा विचार मोठ्या पक्षांनी करावा.' असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी युती सरकारवर इशारा वजा टीका केली आहे.
आज शरद पवार मारकडवाडीक उपस्थित राहून गावकऱ्यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. मारकडवाडी गावकऱ्यांनी बॅलेट पेपरचा मुद्दा उचलला असून, त्यांनी ईव्हीएमला विरोध दर्शवला आहे. तसेच या उपक्रमाबद्दल शरद पवार यांनी कौतूक केलं. दरम्यान ईव्हीएमवर आंदोलन करून काही फायदा होणार नाही. शरद पवार गाव खेड्यांमध्ये राजकारण करतात. असं म्हणत, सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.
नाना पटोले यांच्याबाबात बोलताना त्यांनी टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, 'मला वाटत नाही, नाना पटोले मान्यताप्राप्त शाळेतून पास झाले असावे. लोकसभेमध्ये काँग्रेसला ९५ लाख मतदान झाले, ज्यात १३ जागा निवडून आले. असं वाटतं त्याचं शिक्षण शरद पवार यांच्या शाळेत शिक्षण झालं असावं. जिथे कॉपी करून लोक पास होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.