Dhanshri Shintre
सध्या बाजारात त्वचेच्या चमकासाठी विविध उत्पादने मिळतात, त्यात फेस सीरमचा वापर विशेषतः वाढलेला आहे.
फेस सीरम विविध प्रकारचे असतात आणि त्यातील घटकांनुसार ते त्वचेच्या विशिष्ट गरजेनुसार निवडणे गरजेचे असते.
कोरड्या त्वचेसाठी हायड्रेटिंग आणि त्वचा उजळवण्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम फायदेशीर असतात.
काही सीरम अँटी-एजिंग आणि काही अॅक्नेसाठी उपयुक्त असतात, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरणे फायदेशीर ठरते.
फेस सीरम अति वापरू नये; चुकीच्या पद्धतीने लावल्यास त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतो. योग्य वापर जाणून घ्या.
स्वच्छ चेहऱ्यावरच सीरम लावा; आधी चेहरा धुवा, मग दोन-तीन थेंब हलक्या हाताने चेहऱ्यावर वापरा.
सीरमनंतर मॉइश्चरायझर आणि दिवसात सनस्क्रीन लावावे; रात्री फक्त मॉइश्चरायझर लावणं अधिक फायदेशीर ठरते.