Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

Dhanshri Shintre

मायग्रेनचा त्रास

लांबचा प्रवास, झोपेची कमी, थकवा, ताण आणि सूर्यप्रकाश यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो, प्रत्येकासाठी कारण वेगळं असतं.

सोपे उपाय

प्रवासादरम्यान डोकेदुखी होत असल्यास, ती टाळण्यासाठी काही सोपे आणि परिणामकारक उपाय जाणून घेणे फायद्याचे ठरू शकते.

भरपूर झोप घ्या

प्रवासाच्या आधी भरपूर झोप घेणे आवश्यक आहे, कारण झोपेचा अभाव मायग्रेनचा त्रास अधिक तीव्र करू शकतो.

डिहायड्रेशन

डिहायड्रेशनमुळे प्रवासात मायग्रेन होऊ शकतो, त्यामुळे पाण्याची बाटली बाळगा आणि नियमितपणे भरपूर पाणी प्यावे.

हलके अन्न खा

जास्त वेळ उपाशी राहणे किंवा गरजेपेक्षा जास्त खाणे मायग्रेन वाढवते, म्हणून वेळेवर आणि हलके अन्न खा.

हेडफोन

गोंगाटामुळे डोकेदुखी वाढू शकते, त्यामुळे प्रवासात नेहमी हेडफोन किंवा इअरप्लग वापरून मन शांत ठेवा.

सनग्लासेस किंवा मास्क

प्रवासा दरम्यान डोळ्यांचे संरक्षण करा; तेज प्रकाश टाळण्यासाठी सनग्लासेस किंवा आय मास्कचा वापर करा, मायग्रेनपासून आराम मिळेल.

औषधे

मायग्रेनचा त्रास वारंवार होत असेल, तर डॉक्टरांनी दिलेली औषधे प्रवासात सोबत बाळगा, त्यामुळे त्रास टाळता येईल.

NEXT: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

येथे क्लिक करा