Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Dhanshri Shintre

आरोग्यासाठी धोकादायक

आजकाल लोक पटकन वजन कमी करण्यासाठी विचार न करता उपाशी राहतात, पण हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

आरोग्यावर परिणाम

उपाशी राहिल्याने वजन खरंच कमी होतं का? जाणून घ्या या पद्धतीमागचं विज्ञान आणि आरोग्यावर परिणाम काय होतात.

मेटाबोलिझम मंदावतो

दिवसभर उपाशी राहिल्यास शरीराचा मेटाबोलिझम मंदावतो, त्यामुळे कॅलरी खर्च कमी होऊन वजन घटण्यास अडथळा येतो.

अनियंत्रित भूक

उपाशी राहिल्यानंतर जेवल्यास अनियंत्रित भूक लागते, त्यामुळे अधिक खाल्ले जाते आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

लेप्टिन व घ्रेलिन हार्मोन्स

उपाशी राहिल्याने लेप्टिन व घ्रेलिन हार्मोन्स बिघडतात, ज्यामुळे भूक नियंत्रण आणि चरबी साठवण प्रक्रियेवर परिणाम होतो.

संतुलित आहार

वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं नव्हे, तर संतुलित आहार आणि सक्रीय जीवनशैली अधिक प्रभावी ठरते.

फसवणूक

शरीराला आवश्यक पोषण मिळालं पाहिजे; उपाशी राहून वजन घटवणं हे आरोग्यदायी नसून फसवणूक ठरू शकते.

NEXT: वजन घटवण्यासाठी ३-३-३ नियम काय आहे? जाणून घ्या 'ही' खास पद्धत

येथे क्लिक करा