sadabhau khot & sharad pawar saam tv
महाराष्ट्र

Nashik: शरद पवारांपासून राज्य वाचवण्याची हीच ती वेळ : सदाभाऊ खाेत

आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न खाेत यांनी उपस्थित केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

नाशिक : राज्यातील सरकार सध्या बारामती (baramati) वरून चालतंय. राज्याचे पवार अँड पवार कंपनीने वाटाेळे केले आहे. या राज्यास आता पवारांपासून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खाेत यांनी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करीत शेतक-यांना आवाहन केले आहे. खाेत (sadabhau khot) यांचे जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा (Jagar Shetkaryancha Aakrosh Maharashtracha) हे राज्यव्यापी अभियान सुरु आहे. ते आज नाशिक (nashik) येथे आले हाेते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (sadabhau khot latest marathi news)

खोत म्हणाले जागर शेतकऱ्याचा आणि आक्रोश महाराष्ट्राचा अभियान आम्ही सुरू केले आहे. त्यातून शेतक-यांचा राज्य सरकारवरील राेष आणखी कळत आहे. कोरोना काळ संपला असला तरी सरकारचा मात्र अद्याप कोरोना (corona) संपत नाही हे दुर्देव आहे. सरकारी तिजोरीवर सरकार दिवसाढवळ्या दरोडा टाकत आहे. हा दराडो लपविण्यासाठी सरकार रोज वेगवेगळे विषय काढत आहे. पीक विमा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) ५० हजार रुपये अद्याप दिलेले नाहीत ही शाेकांतिका म्हणावी लागेल.

शिवसेनेची (shivsena) सत्ता आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याचे दहा हजार भरणार हे आश्वासन देण्यात आले होते. दहा हजार सोडा शेतकऱ्यांची वीज सरकार कापू लागले आहे. दूसरीकडे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही वीज मोफत देऊ असे अजित पवार (ajit pawar) यांनी सांगितले होते. त्याचे काय झाले असा प्रश्न खाेत यांनी उपस्थित केला आहे.

सरकार कष्टकरी वर्गाची चेष्टा करीत आहे. दूध , कांदा प्रश्न गंभीर झाला आहे याकडे सरकार लक्ष देत नाही. सरकारच्या विरोधात जे बोलेल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. सत्तेत असताना तुम्ही तुडवा, गाडा असे शब्द वापरता तुम्ही काय औरंगजेबचे अवलाद आहे का अशी टीका संजय राऊत यांच्यावर खाेत यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेकजण मलब्याखाली दबले

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT