Sadabhau Khot Latest Marathi News, NCP News Saam Tv
महाराष्ट्र

व्हिडिओ मागे टोमॅटोसारखे लाल गाल असलेल्या NCPच्या नेत्याचा हात; सदाभाऊ खोत यांचा आरोप

सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओत सदाभाऊ यांना एक हॉटेलमालक उधारी चुकवण्याची मागणी करताना दिसून येत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मगच पुढं जावा असं म्हणत सांगोला (Sangola) येथील अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सदाभाऊ यांची वाट अडवली होती. दरम्यान, आज सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे. (Sadabhau Khot Latest Marathi News)

बिलाप्रकरणी आरोप करणार्‍या हॉटेल मालकामागे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा हात आहे.या नेत्याचे नाव योग्य वेळी सांगणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. गुरुवारी व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागे टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीतील एका नेत्याचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. हॉटेल माकल अशोक शिनगारे हा मोठा गुन्हेगार असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याने केलेल्या आरोपांना मी घाबरत नाही. राष्ट्रवादीच्या या राजकीय खेळीमुळे माझा आवाज दाबता येणार नाही, असंही सदाभाऊ खोत ठणकावून सांगितले आहे.

हे देखील पाहा -

पुढे सदाभाऊ खोत म्हणाले की, अशोक शिनगारे यांच कोणतही हॉटेल नाही. अशोक शिनगारेंविरोधात विविध गुन्हे दाखल असून सोने चोरीचा गुन्हा दाखल आहेत. शिनगारे यांच्याविरोधात चोरीसह एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय चेक बाउन्स प्रकरण आणि फसवणुकीच्या आरोपाखाली शिनगारेंविरोधात गुन्हा दाखल आहे अशी माहिती देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिली. शिनगारे याला जेवढे सांगितले होते, तेवढीच तो बोलत होता. तसेच आमचा ताफा आल्यानंतर व्हिडिओ काढून व्हायरल केला असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

शिनगारे यांच्याविरोधात तक्रार

सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवणाऱ्या अशोक शिनगारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिनगारे यांच्याविरुध्द सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाभाऊ खोत यांचा पंचायतराज समिती दौऱ्यावर असताना ताफा अडवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. भादवि 341,186 आणि 104 कलमानुसार शिनगारे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्व प्रकारामागे राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप देखील सदाभाऊ खोत यांनी केला आहे. रयत क्रांती संघटनेचे सांगोला तालुकाध्यक्ष भारत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poet Death: महाराष्ट्राचा तेजस्वी तारा निखळला! सुप्रसिद्ध कवी यांचे निधन, मराठी साहित्यविश्वात शोककळा

नवलेनंतर 'या' उड्डाण पुलावर भीषण अपघात, ८-१० गाड्या एकमेकांवर आदळल्या, काचा फुटल्या अन्...

Bads of Bollywood: समीर वानखेडे यांच्या याचिकेला नेटफ्लिक्सचा विरोध; 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' विरोधात केला होता उच्च न्यायालयात अर्ज

Metro 14 : १८ हजार कोटी मंजूर, बदलापुरातून मेट्रो कधी धावणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितली विकासाची ब्लू प्रिंट, वाचा

Mumbai: पदपथ अन् बिल्डिंगच्या टेरेसवर होर्डिंग लावण्यास मनाई, पालिकेकडून नवे जाहिरात धोरण जाहीर; काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT