Fort In Nashik : आकाशाला भिडणाऱ्या पायऱ्यांचा थरार, नाशिकमधील 'या' किल्ल्याची भव्यता पाहून हृदयाचा ठोका चुकेल

Shreya Maskar

नाशिक

हरिहर किल्ला (हर्षगड) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. हा किल्ला त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत असून, नाशिक शहरापासून सुमारे ४० किमी आणि इगतपुरीपासून ४८ किमी अंतरावर आहे.

Nashik | google

हरिहर किल्ला

हरिहर किल्लात्याच्या ९० अंश सरळसोट (उभ्या) कातळात कोरलेल्या पायऱ्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. येथे हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो.

Harihar Fort | google

ट्रेकिंग

८० अंशांच्या तीव्र कोनात कोरलेल्या कातळ-पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याचा ट्रेक साधारणपणे निर्गूडपाडा किंवा हर्षेवाडी या पायथ्याच्या गावांतून सुरू होते.

Trekking | google

किल्ला कोणी बांधला?

हरिहर किल्ल्याची निर्मिती सेऊना (यादव) राजवंशाच्या काळात (९ व्या ते १४ व्या शतकाच्या दरम्यान) झाली. हरिहर किल्ला १३ व्या शतकातील आहे.

Who Built the Fort? | google

विहंगम दृश्ये

हरिहर किल्ल्याच्या शिखरावरून हिरव्यागार सह्याद्री पर्वतरांगांचे आणि बासगड, ब्रह्मगिरी , अंजनेरी यांसारख्या शेजारील शिखरांचे ३६० अंशांतील विहंगम दृश्य पाहता येते.

Views | google

मंदिरे

हरिहर किल्ल्यावर भगवान शिव, भगवान हनुमान आणि नंदी यांच्या मूर्ती असलेली प्राचीन मंदिरे, तसेच एक लहान आणि शांत पाण्याचे कुंड पाहायला मिळेल.

Temples | google

इतर किल्ले

नाशिकमध्ये अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. यात साल्हेर किल्ला, त्रिंगलवाडी, अलंग, मदन आणि कुलंग किल्ल्यांची रांग, अंकाई-टकाई, मुल्हेर व मोरागड यांचा समावेश आहे.

Other Forts | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : धुक्याची चादर अन् थंडगार वारा; मे महिन्यात करा कोकण वारी, पाहा 'ही' ५ Hidden हिल स्टेशन्स

Konkan Tourism | saam tv
येथे क्लिक करा...