Sada Sarvankar Saam TV
महाराष्ट्र

Sada Sarvankar : बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून सत्याचा उलगडा; सुटलेली ती गोळी सरवणकरांच्याच बंदुकीतली

आता सरवणकर आणखीन अडचणीत पडण्याची शक्यता आहे.

Ruchika Jadhav

Sada Sarvankar : मुंबईतील प्रभादेवी येथे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटामध्ये काही महिन्यांपूर्वी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. ही गोळी आमदार सदा सरवणकरांच्या बंदुकीतूनच सुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि सदा सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने जुळल्याचे, बॅलेस्टिक तज्ज्ञांनी आपला अहवालात म्हटले आहे. यामुळे आता सरवणकर आणखीन अडचणीत पडण्याची शक्यता आहे. (Latest Sada Sarvankar News)

नेमकी घटना काय आहे?

सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवात विसर्जनावेळी प्रभादेवी येथे शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही आमने सामने आले होते. यावेळी दोन्ही गटात चांगलीच हणामारी झाली. या घटनेनंतर १५ सप्टेंबर रोजी दादर पोलिसांनी दोन्ही गटांतील व्यक्तींवर गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला.

यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते पोलिस स्टेशन आवारात उभे होते. सरवणकर देखील तिथेच होते. तेव्हा त्यांनी अचानक आपल्या बंदूकीने जमीनीवर गोळी झाडल्याची घटना घडली. याबाबत त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी जोर धरू लागली. अशात पोलिसांनी देखील सरवणकरांविरोधात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

यावेळी आपल्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचे सरवणकर म्हणत होते. मात्र दाखल तक्रारीनुसार कारवाई पुढे सुरू राहिली. यात त्यांच्याकडे परवाना असेलेली रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली. तसेच तपासणीसाठी कलिना येथे पाठवण्यात आली.

तसेच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही चेक केले आहेत. सदर घटनेच आता बॅलेस्टिक अहवाल देखील समोर आल्याने ती गोळी सरवणकरांच्याच बंदुकीतून सुटल्याचे स्पष्ट समजत आहे. लवकरच पोलिस पुढील कारवाईस सुरूवात करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT