दुःखद! घराला आग लागून वयोवृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू! SaamTVNews
महाराष्ट्र

दुःखद! घराला आग लागून वयोवृद्ध महिलेचा होरपळून जागीच मृत्यू!

आगीत होरपळत असताना आजीने जोरजोरात आवाज दिला. पण, त्यांचा आवाज ऐकायला त्याठिकाणी कोणीही नव्हते. घरातील लहान मुलेही आजींना मदत करण्यास असमर्थ ठरली.

गोविंद साळुंके

अहमदनगर : अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे घराला आग लागून आगीमध्ये वयोवृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोळे गावातील शिवराम पारधे व त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळी मोलमजुरी करण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, स्वयंपाक करून झाल्यानंतर चुलीमध्ये थोडासा विस्तव राहिल्याने भर दुपारी चुलीत असलेल्या लाकडाने पेट घेतला.

हे देखील पाहा :

पाहता पाहता या आगीने रौद्र रूप धारण केले. तसेच धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात घरामध्ये तयार झाले. घरामध्येच शिवराम पारधे यांच्या वयोवृद्ध आई अनुसाया पारधे (वय 78) आणि तीन लहान मुले घरात होती. आग लागल्यानंतर या चिमुकल्यांनी घरातून पळ काढला. मात्र, अनुसया आजींना बाहेर पडता आले नाही. आगीत होरपळत असताना आजीने जोरजोरात आवाज दिला. पण, घराशेजारील सर्वच जण मोलमजुरी करणारे असल्याने शेतात कामाला गेले होते. आजीचा आवाज कोणालाही ऐकायला गेला नाही व त्यांना घराबाहेर पडताही आले नाही. त्यांचा या आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्रानेच खुपसला भारताच्या पाठीत खंजीर, भारतीय तेल टँकरवर इराणची फायरिंग

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या घरातील 'रणरागिणी' चा पत्ता कट; शेवटच्या क्षणी बाजी पलटली | VIDEO

अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार? होर्मुझवरुन इराणचा अमेरिकेला इशारा

TCS धर्मांतर प्रकरणानंतर मुंबईतही धक्कादायक प्रकार; प्रेमाच्या बहाण्याने १६ वर्षीय तरुणीला पळवलं

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस

SCROLL FOR NEXT