Saamana Editorial
Saamana Editorial Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: PM मोदींची लोकप्रियता रसातळाला, कृत्रिम लाटा तयार करण्याचा प्रयत्न; 'रोखठोक'मधून हल्लाबोल

Ruchika Jadhav

Saamana Editorial News: देशात सर्वत्र जातीवाद, दंगली, शेतकरी आत्महत्या होताना दिसत आहेत. या परिस्थितीत देखील राजकीय नेते आगामी निवडणुकीच्या मोर्चे बांधणीत गुंतले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये राज्य कसं चाललं आहे? ते ठामपणे सांगता येणार नाही. अशात आज सामनाच्या रोकठोकमधून मोदी-शहांचे राज्य कसे चालले आहे? याचा खुलासा करत अनेक प्रश्न विचारण्यात आलेत. (Latest Marathi News)

रोकठोकमध्ये 'ट्विटर'चे माजी 'सीईओ' जॅक डोर्सी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रेगन व मोदी अशा काही उदाहरणांच्या आधारे देश नेमका कसा चालला आहे हे सांगण्यात आलंय. देशात सुरु असेल्या घडामोडींमुळे पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट पुरती ओसरली आहे. मुळात ही लाट खरी नव्हती. राहुल गांधी यांच्यामुळे मोदींना निवडणूक जिंकणे सोपे जाते असे बोलले गेले. आता चित्र बदलले आहे. मोदी यांच्यामुळेच राहुल गांधी यांना भाजपचा पराभव करणे सोपे जाईल, असा विश्वास रोकठोकमधून व्यक्त करण्यात आला आहे.

मोदी-शहांचे राज्य नेमके कसे चालले आहे?

मोदी-शहांचे राज्य नेमके कसे चालले आहे? याचा खुलासा 'ट्विटर'चे माजी 'सीईओ' जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारविरोधी भूमिकांना 'ट्विटर'वर स्थान देऊ नका, असा दबाव असल्याचा स्फोट डोर्सी यांनी केला, असं रोकठोकमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे डोर्सी यांनी केलेले आरोप आणि खुलासे देखील सांगण्यात आले आहेत.

काय म्हणाले जॅक डोर्सी?

भारत सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान दबाव आणला होता की, आंदोलनासंदर्भातल्या बातम्या व भूमिकांना स्थान देऊ नका. आमचे ऐकले नाहीत तर भारतातील 'ट्विटर' कार्यालय बंद पाडू व तुमच्या कर्मचाऱ्यांवर धाडी घालू, असा खुलासा 'ट्विटर'चे माजी 'सीईओ' जॅक डोर्सी यांनी केला होता. त्यामुळे आता यावर डोर्सी खोटं बोलत असल्याचं केंद्र सरकारकडून म्हटलं जात आहे. त्यावरुन रोकठोकमध्ये हुकूमशहा हा डरपोकच असतो, अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे.

पत्रकारास नोकरीतून काढून टाकले

रोकठोकमध्ये पुढे स्मृती इराणी यांचा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. " स्मृती इराणी या केंद्रीय मंत्री उत्तर प्रदेशातील त्यांच्या अमेठी मतदारसंघात गेल्या. तेथे एका पत्रकाराने विचारले, 'आपण तर विरोधी पक्षात असताना महागाईविरोधात आंदोलन करीत होता. गॅस सिलिंडर घेऊन मोर्चे काढीत होता. आता तुम्ही गॅस सिलिंडरचा भाव कधी खाली आणणार ते सांगा!' या प्रश्नावर श्रीमती इराणी त्या पत्रकारावर भडकल्या. 'तुझ्या मालकांशीच बोलते' असा दम भरला व त्या मालकाने त्या पत्रकारास नोकरीतून काढून टाकले"

मोदी यांनी देश व जनतेसाठी काय केले?

"पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची लोकप्रियता पूर्ण रसातळाला गेली आहे. लोकप्रियतेच्या कृत्रिम लाटा निर्माण करण्याचा प्रयत्न यापुढे केला जाईल. मोदी यांनी देश व जनतेसाठी काय केले? असा प्रश्न इतिहासात विचारला गेला तर धार्मिक तणाव, दंगलींचे राजकारण व खोटेपणाचे राजकारण हे त्याचे उत्तर आहे. विरोधकांच्या टीकेस उत्तर देण्याचे साहस त्यांच्यात नाही व पत्रकारांच्या समोर उभे राहून 'फैरी'शी सामना करण्याचे बळ त्यांच्यात नाही. पाकिस्तानला ते धमक्या देतात, पण चीनने सीमेवर नवा रनवे, लष्करी इमारत, बंकर, हेलीपॅड, रस्ते, पूल, रेल्वे, मिसाईल स्थळे निर्माण करून भारतापुढे आव्हान उभे केले आहे, असं रोकठोकपणे सामनातून सांगण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Rajan Vichare News : ठाण्यात बोगस मतदान होणार, राजन विचारे यांचा दावा

Kalyan Election Voting LIVE : डोंबिवली पूर्वेत EVM मशीनमध्ये बिघाड, मतदारांचा खोळंबा

Lok Sabha 2024: भाजप सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही लुटतंय; व्हिडिओ X पोस्ट करत राहुल गांधीचा गंभीर आरोप

Shantigiri Maharaj : शांतिगिरी महाराजांनी मतदानापूर्वी EMV मशीनला घातला फुलांचा हार; VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT