Saamana Editorial
Saamana Editorial Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: अजित पवारांना वेगळी भूमिका घेण्यापासून वाचवण्यासाठी शरद पवारांनी राजीनामा दिला? सामनातून सवाल

Ruchika Jadhav

Political News : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं यावर अनेक तर्क लावले जात आहेत. अशात काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र अजित पवारांनी स्वत: या सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे. अशात आता शरद पवारांच्या राजिनाम्याची कारणे सांगताना सामनातून अजित पवारांविषयी सुरु असलेल्या प्रश्नांवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले काय? असा सवाल उपस्थित करत अग्रलेखात म्हटलं आहे की, शिवसेना फुटली चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन आणि पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो. शरद पवार यांनी राजीनामा देताच त्यांची मनधरणी सुरू झाली हे स्पष्ट दिसते.

अजित पवारांचे अंतिम ध्येय मुख्यमंत्री पद

अजित पवारांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील अनेक नेते आज कुंपणावर आहेत आणि त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्या जास्त विलाप केला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर...

शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना उघडे केले. मळभ आणि हवा स्वच्छ केली. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असा हा विषय असला तरी . शरद पवार हे या घडामोडींचे नायक आहेत. त्यांच्या राजीनाम्याचा निकाल लागेपर्यंत महाराष्ट्रात हालचाली सुरूच राहतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

J P Nadda : भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो; RSSच्या प्रश्नावर जे.पी.नड्डा यांचं वक्तव्य

Sonalee Kulkarni : पत्रकार ते अभिनेत्री; सिनेसृष्टीतील 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीचा इंडस्ट्रीतील थक्क करणारा प्रवास

Gurucharan Sinh News | तारक मेहता फेम अभिनेते गुरुचरण सिंह परतले

Health Tips Water : तहान नसतानाही पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक

Mulund BJP News | पैसे वाटल्याचा आरोप, भाजप आणि ठाकरे गटाचा राडा

SCROLL FOR NEXT