saamana editorial Saam TV
महाराष्ट्र

Saamana Editorial: कळव्यातील मृत्युकांड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत; सामनातून एकनाथ शिंदेंसह तानाजी सावंतांवर जहरी टीका

Political News: आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी सामनातून करण्यात आली आहे.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News: ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केवळ तीन दिवसांत २७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. अशात या प्रकरणी सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर कठोर शब्दांत हल्लाबोल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

"मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख आहेत आणि आरोग्य मंत्री त्यांच्याच गटाचे आहेत. कळवा रुग्णालयातील मृत्युकांडाचे उत्तरदायित्व त्यांचेच आहे. विरोधकांवर आगपाखड करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत.",असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सामनातून देण्यात आला आहे.

आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला!

आगामी निवडणुकांवर लक्ष करत सामनातून पुढे म्हटलंय की, "प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे. आधी प्रायश्चित्त घ्या आणि मग काय ते बोला! बाकी शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय आरोग्यदेखील बिघडलेलेच आहे. ते सुधारण्यासाठी जनतेलाच 2024 मध्ये मोठी 'शस्त्रक्रिया' करावी लागणार आहे."

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी घटनास्थळी पाहाणी केली. त्यावरुन देखील सामनातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. "ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्युकांड सुन्न करणारे तर आहेच, पण मिंधे सरकारच्या काळात संपूर्ण राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था 'व्हेंटिलेटर'वर गेल्याचा ढळढळीत पुरावा आहे. 13 ऑगस्टच्या रविवारी एका रात्रीत या रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्युकांडाने महाराष्ट्राला हादरे बसले, पण ठाणे-कळवा ज्यांचे 'होम ग्राऊंड' आहे त्या मुख्यमंत्र्यांना ते जाणवायला बहुदा दोन दिवस लागले. सोमवारी रात्री त्यांचे पाय कळवा रुग्णालयाला लागले. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्याने ते म्हणे महाबळेश्वर येथे आराम घेत होते. तुम्ही तुमच्या प्रकृतीस जपा, हवा तिथे, हवा तेवढा आराम करा, पण आपण जनतेच्या मदतीला कसे लगेच धावून जातो याचे नाटक निदान यापुढे तरी करू नका."

सावंतांनी राजीनामा द्यायला हवा

"कळवा रुग्णालयातील 18 मृत्यू 24 तासांतील आहेत. त्यामुळे आताच्या 'सावंतां'नीही राजीनामा द्यायला हवा. ते देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पायउतार करायला हवे. कारण प्रश्न कळव्यातील मृत्युकांडाचे आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला कोमात ढकलण्याचे प्रायश्चित्त घेण्याचा आहे.", अशा शब्दांत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी सामनातून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मशिदीजवळ बॉम्बस्फोट, ६ जणांचा मृत्यू; १०० जण होरपळले, मालेगावात १७ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Gifts For Girlfriend: गर्लफ्रेंडला इंप्रेस करायचं आहे? मग या सुंदर गोष्टी द्या भेट

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून जल्लोष

Raksha Bandhan 2025: शास्त्रानुसार राखी कोणत्या हाताला बांधावी?

HBD Kiara Advani : सुंदर दिसण्यासाठी कियारा अडवाणी लावते 'हा' फेसपॅक, फक्त ५ रूपयांत घरीच होतो तयार

SCROLL FOR NEXT