Datta Bharane On Urea Black Market Saam Tv
महाराष्ट्र

Saam Tv Impact: मोठी बातमी! युरीयाचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, कृषीमंत्री दत्ता भरणेंचा इशारा

Datta Bharane On Urea Black Market: राज्यामध्ये युरिया खताचा काळाबाजार सुरू असून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. साम टीव्हीने स्टिंग ऑपरेशन करून हे प्रकरण समोर आणले. आता कृषीमंत्र्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला.

Priya More

Summary -

  • साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशननंतर युरियाचा काळाबाजार उघड

  • कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी कडक कारवाईचा दिला इशारा

  • दोषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित होणार

  • शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन

साम टीव्हीने स्टिंग ऑपरेशन करून राज्यात सुरू असलेल्या युरिया खताच्या काळाबाजारचा आणि शेतकऱ्यांच्या लुटीचा पर्दाफाश केला होता. साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी युरीयाचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती दिली. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या मुजोर कृषी केंद्र चालकांच्या दुकानाचा परवाना निलंबित केला जाईल असे त्यांनी सांगितले.

कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितले की, 'यासंदर्भात आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीमध्ये तथ्य १०० टक्के आहे. याप्रकरणात अनेक दोषी सापडले आहेत. जे कुणी दोषी असतील त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. आम्ही यासाठी चौकशी समिती नेमली आहे. येणाऱ्या ८ दिवसांत दोषींवर कारवाई केली जाणार आहे. दोषींच्या दुकानाचे लायसन्स सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी सस्पेंड करून त्या जागेमध्ये कुणाला दुसऱ्या नावावर नवी परवानगी मिळणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत. जेणेकरून हा संदेश संपूर्ण राज्यभरात जाईल.'

तसंच, 'हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांची कुणी फसवणूक करत असेल आणि चढ्या भावाने युरियाची विक्री करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आमच्याकडे तक्रारी आल्यानंतर आम्ही कारवाई करत अनेक दुकानांचा परवाना रद्द केला आहे. सरकार शेतकरी बांधवांचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर राज्यभरात आमचे जे कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही तक्रार करा किंवा आम्हाला थेट मेसेज करू शकता. चौकशी समितीकडून अहवाल घेऊन ताबडतोब युरिया विक्री करणाऱ्यांचे परवाने निलंबित केले जातील.' असे देखील कृषीमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात युरियासह पेस्टीसाईड खरेदीची शेतकऱ्यांना सक्ती केली जात आहे. अनधिकृतपणे सक्ती करून शेतकऱ्यांना लुटण्याचा गोरखधंदा सुरू होता त्याचा पर्दाफाश साम टीव्हीने केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात युरिया खताचा काळाबाजार सर्रासपणे सुरू होता आणि शेतकऱ्यांना विनाकारण जास्तीचे पैसे मोजून देखील मुजोर कृषी केंद्र चालकांची मनमानी सहन करावी लागत होती. साम टीव्हीने या युरीयाच्या काळाबाजाराचा पर्दाफाश केल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषीमंत्र्यांनी देखील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT