Arjuni Morgaon SaamTv
महाराष्ट्र

Arjuni Morgaon Exit Poll : अर्जुनी मोरगाव मतदारसंघात कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll News : यंदाच्या विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी झालेल्या अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात मतदार आमदार पदाची माल कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत रंगली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉंग्रेसने दिलीप बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे.

अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अजित पवार गटाचे राजकुमार बडोले यांच्या नावाला मतदारांची पसंती असल्याच सकाळ एक्झिट पोलमधून दिसत आहे. त्यामुळे संभाव्य आमदार म्हणून बडोले यांचं नाव पुढे आलं आहे. तर कॉंग्रेसचा या मतदारसंघात पराभव होण्याची शक्यता आहे.

अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी झालेली बघायला मिळाली आहे. राजकुमार बडोले हे भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात आले आहेत. तर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुडे यांना उमेदवारी डावलल्याने त्यांनी अजित पवार गटाला रामराम करत बच्चू कडू यांच्या प्रहारमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने कॉंग्रेसचे अजय लांजेवर यांनी देखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

या सगळ्या बंडखोरीमुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघात चुरशीची लढत होऊन मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. सध्या तरी एक्झिट पोलमधून मतदारांचा कौल हा राजकुमार बडोले यांना मिळतांना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचायला सुरुवात

PM Ujjawala Yojana: पीएम उज्जवला योजनेत मिळतात मोफत गॅस सिलेंडर; आवश्यक कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया घ्या जाणून

SCROLL FOR NEXT