साम टीव्ही मराठीचा महापालिका निवडणुकांचा एक्झिट पोल जाहीर
ठाणे महापालिकेत शिंदे गटाचं वर्चस्व कायम
ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का
नवी मुंबई महापालिकेच्या 28 प्रभागात पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने 111 नगरसेवकपदासाठी 500 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 27 प्रभागांत चार उमेदवारांचे तर 28 क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य पॅनल होतं. आज सकाळी 7.30 ते सायं. 5.30 या वेळेत मतदान झालं. 500 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद झाले असून उद्या या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता या निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आलेत. साम टीव्हीनं केलेल्या सर्व्हेक्षणानुसार नवी मुंबई महापालिका आणि ठाण्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यात आहे.
ठाणे महापालिकेत एकनाथ शिंदेंनी आपला बाल्ले किल्ला राखलाय. मुंबई उपनगरातील ठाणे महापालिका सर्वात महत्त्वाची आहे. यात एकनाथ शिंदेंनी वर्चस्व राखले असून शिंदे गट शिवसेनेला सर्वाधिक ७२ जागा मिळण्याचा अंदाज सामच्या सर्व्हेक्षणात वर्तवण्यात येत आहे. तर शिंदे गटानंतर दुसऱ्या नंबर भाजप असून ठाकरे सेना आणि मनसेला अपयश आलंय. तर नवी मुंबईत शिंदे गटाला मोठा फटका बसलाय.
येथील लढाई खूपच चुरशीची ठरली होती. येथे भाजपविरुद्ध शिंदे सेना अशी लढाई रंगली होती. यात भाजप नेते गणेश नाईक यांनी थेट एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं होतं. ते वारंवार शिंदेंवर टीका करत होते. त्याचाच फायदा भाजपला होताना दिसतोय. साम टीव्हीच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, येथे भाजप मोठा पक्ष ठरलाय, तर शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय.
उल्हासनगरमध्ये भाजपला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला तर शिंदे गट पहिल्या स्थानी राहील असा अंदाज आहे. त्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या अजित पवार गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता सामच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. येथे भाजप आणि शिंदे गटात मोठी चुरस होती. दरम्यान एक्झिट पोलनुसार उल्हासनगरात त्रिशंकू सत्ता येऊ शकते असा अंदाज आहे.
वसई-विरारमध्ये बहुजन विकास पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत होती. येथे भाजपमध्ये मोठा पक्ष असेन असा अंदाज वर्तवला जात होता कारण भाजपने येथे मोठी ताकद लावली होती. परंतु बहुजन विकास आघाडी पक्षानं कमळाचा चुराडा केल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून दिसत आहे.
एकूण 28 प्रभाग : 111 सदस्य संख्या
500 उमेदवार निवडणूक रिंगणात
नवी मुंबई महापालिका
भाजप 111
शिवसेना 106
मनसे 25
राष्ट्रवादी शरद पवार गट 27
राष्ट्रवादी अजित पवार गट 26
काँग्रेसने 9
उबाठा शिवसेना 56 उमेदवार रिगंणात उतरले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.