Saam Survey Ajit Pawar or Supriya Sule saam tv
महाराष्ट्र

Saam Survey: शरद पवारांचा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे? समर्थकांचा कल समोर

Sakal-Saam Survey: वेगवेगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांची मते सकाळ-साम समुहाने जाणून घेतली.

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Resigns Sakal-Saam TV Survey: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा दिल्यानंतर सकाळ-साम समुहाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला. वेगवेगळ्या प्रश्नांवर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांची मते सकाळ-साम समुहाने जाणून घेतली. यात सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सर्वेक्षणात विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे

• शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. याबद्दल आपल्याला काय वाटते?

शरद पवार यांनी राजीनामा देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला हे योग्य असे ४७.५ % लोकांना वाटते, तर ४५.९% लोकांना वाटते कि त्यांचा निर्णय योग्य नाही. इतरांनी याबद्दल सांगता येत नाही असा कौल दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या याबद्दलचा कल

सोडू नये - 73.4%

योग्य केले - 24.6%

सांगता येत नाही - 2%

राष्ट्रवादी वगळता इतर पक्ष :

सोडू नये - 35.64%

योग्य केले - 56.10%

सांगता येत नाही - 8. 28%

• शरद पवार यांच्या या निर्णयामुळे मविआ वर परिणाम होईल, असे वाटते का?

शरद पवार यांच्या या निर्णयामुळे मविआवर नक्कीच परिणाम होईल असे ६०.७% लोकांना वाटते आहे, तर २८.४ लोकांना वाटते कि सांगता येणार नाही. शरद पवार यांच्या या निर्णयामुळे मविआ वर परिणाम होईल, असे वाटते का?

नक्कीच होईल - 60.7%

होणार नाही - 28.4%

सांगता येत नाही - 10.9%

• अजित पवार भाजपसोबत जातील म्हणून शरद पवारांनी निर्णय घेतला आहे, असे वाटते का?

या प्रश्नावर ४१ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे, तर ३६.६ % लोकांनी हो असे उत्तर दिले आहे तर २२.४% लोकांनी सांगता येणार नाही असे म्हटले आहे.

राष्ट्रवादी समर्थक म्हणतात

हो - 19.43%

नाही - 60.42%

सांगता येत नाही - 20.23%

• मुख्यमंत्री पदासाठी अजित पवार मविआमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील, असे वाटते का?

यावर उत्तर देतांना ४२.५% लोकांना वाटत कि अजित पवार भाजपसोबत जाणार नाहीत. तर ३३% लोकांना वाटत ते भाजपसोबत जातील. यामध्ये २४.५ % लोक याबद्दल निश्चित सांगू शकलेले नाहीत.

राष्ट्रवादी समर्थक म्हणतात

हो - 20.51%

नाही - 58.82%

सांगता येत नाही - 20.75%

• अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल, असे वाटते का?

अजित पवार यांनी भाजप सोबत जावून सरकार स्थापन केले तर महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल याबद्दल ५९.६ % लोकांनी नाही असे उत्तर दिले आहे, तर २०% लोकांनी हो असे उत्तर दिले आहे. सांगता येत नाही असं नोंदवणारी लोकं २०.३% आहेत.

• एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली, असे वाटते का?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत जाऊन भाजपने चूक केली का याबद्दल विचारणा केल्यावर ५७.५% लोकांना वाटत होय ही चूक होती, तर ३१. ९% लोकांना वाटत हि चूक नव्हती. तर १०.६ % लोक याबद्दल नेमकं सांगू शकलेले नाहीत.

• भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास भाजप अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून संधी देईल का?

या प्रश्नावर २६.५ % लोकांना वाटत कि भाजप अशी संधी अजित पवार याना देईल, तर ४४.७ % लोकांना वाटत भाजप अशी संधी देणार नाही. तर २८.८% लोक नेमकं सांगू शकले नाहीयेत.

• राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल?

सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या कलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्यातील नेतृत्व म्हणून अनेकांनी सुळे (३५.२%) यांना पसंती दिली आहे, तर त्याखालोखाल अजित पवार (३२. १%) यांना पसंती मिळाल्याचे दिसते. पवार कुटूंबाबाहेरील सदस्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. जयंत पाटील यांना १६.६ टक्के लोकांनी पसंती दिली. (Latest Marathi news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT