Raigad Rain News Saam Digital
महाराष्ट्र

SAAM Impact : पुराच्या पाण्यात दामटवली प्रवाशांनी भरलेली बस, ड्रायव्हर सस्पेंड; थरारक VIDEO बघाच!

Raigad ST Bus Video : पाली येथून पेणला जाणाऱ्या बसच्या चालकाने स्टंटबाजी करत अंबा नदीवरील पुलावरून प्रवाशांनी भरलेली बस चालवल्याचा व्हिडिओ समोर आला होता. सामने दाखवलेल्या बातमीनंतर संबंधित चालकाचं निलंबन करण्यात आलं आहे.

Sandeep Gawade

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान प्रवाशी जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. त्यात रायगडमधूनही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी महामंडळाच्या चालकाने बस थेट पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून चालवली आहे, त्यामुळे संताप व्यक्त होतं आहे.

पाली येथून पेणला जाणाऱ्या ST बस चलकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करीत स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना आज सकाळी अंबा नदीवरील पुलावर भेरव गावाजवळील घडली आहे. अंबा नदीचे पाणी पुलावरून वहात असताना धोकादायक परिस्थितीत चालकाने स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली. यासंदर्भात संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली होती.

प्रवाशी आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेत आणि सामच्या बातमीनंतर पेण आगाराचा चालक यू. एम. बनसोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एसटीचे रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे यांच्या उपोषणाची तयारी पूर्ण, उपोषणासाठी मंडप तयार

7 Days Stop Watching Reels: 7 दिवस रील्स न पाहिल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा अचानक यू-टर्न? आधी मनसेवर केले गंभीर आरोप, आता राज ठाकरेंचे मानले आभार

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' महिलांना मिळणार नाही हप्ता; तुमचं यात नाव नाही ना?

एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT