SAAM IMPACT: बैलगाडा शर्यतीविरोधात अखेर गुन्हा दाखल...!
SAAM IMPACT: बैलगाडा शर्यतीविरोधात अखेर गुन्हा दाखल...! रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

SAAM IMPACT: बैलगाडा शर्यतीविरोधात अखेर गुन्हा दाखल...!

रोहिदास गाडगे

पुणे: राज्यात बैलगाडा शर्यतीवर कायदेशीर बंदी आहे. मात्र असं असतानाही पुण्यातील आंबेगाव तालुक्यात कायदा मोडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघातच बैलगाडा शर्यत बंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले होते. याबाबत साम टिव्हीने बातमी दाखवली होती, आणि आता सामच्या बातमीनंतर या बैलगाडा शर्यतींच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (SAAM IMPACT: finally case registered against bullock cart race)

हे देखील पहा -

आंबेगाव तालुक्यातील गिरवली आणि वडगाव काशिंबे गावात बैलगाडा शर्यत पार पडली होती. सामच्या बातमीनंतर गिरवली येथील घोडेगाव तर वडगाव काशिंबे येथील मंचर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतबंदी असतानाही आयोजकांकडुन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. घोडेगाव पोलीसांत पाच जणांसह 100 अज्ञातांंवर, मंचर पोलीसांत पाच जणांसह 100 अज्ञातांवर भा.द.वि.क. 188, प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11(1)(अ), म.पो.का.क. 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT