Maharashtra exit polls : Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra exit polls : माकप डहाणूचा गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

dahanu exit poll , Saam exit poll : डहाणू विधानसभा मतदारसंघात माकप गड राखण्याची शक्यता आहे. विनोद निकोले पुन्हा आमदार होऊ शकतात.

Vishal Gangurde

डहाणू विधानसभा मतदारसंघात माकपचा मतदारसंघ मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदासंघात डाव्या पक्षांची सत्ता आहे. या मतदारसंघात यंदाही माकपचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात डहाणू मतदारसंघ महत्वाचा मानला जातो. डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून विनोद निकोले रिंगणात आहेत. तर भाजपकडून विनोद मेढा रिंगणात उभे आहेत. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, माकपचे विनोद निकोले संभाव्य आमदार असू शकतात. डहाणूचा गड विनोद निकोले यांनी कायम ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद निकोले हे संभाव्य आमदार असू शकतात.

डहाणू विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक जास्त मतदान झालं आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघ हा शहरी, ग्रामीण आणि डोंगरी अशा तीन भागात विभागलेला मतदारसंघ आहे. सुरुवातीपासून या मतदारसंघात माकपचा दबदबा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून माकपचं वर्चस्व कायम आहे. यंदाही माकपने विनोद निकोले यांच्यावर विश्वास दाखवला होता. तर त्यांच्या विरोधात भाजपने विनोद मेढा यांना उमेदवारी दिली होती. तर मनसेनेही या मतदारसंघात उमेदवार दिला आहे. मात्र, या मतदारसंघात मनसेचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे या मतदारसंघात थेट लढत माकप विरुद्ध भाजप अशी आहे. या लढतीत विनोद निकोले बाजी मारू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT