Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र

Saam Exclusive: ठरलं! विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढणार; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, पाहा Video

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. विधानसभेसाठी चाचपणी करणार आहेत.

Bharat Jadhav

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. आम्हाला राजकारणात जायचं नाही, पण आरक्षण न दिल्यास आमचा नाईलाज असे जरांगे पाटील म्हणालेत. मनोज जरांगे पाटील ६ जुलैला आधी मराठा आरक्षणसाठी हिंगोली दौरा केला जाणार आहे. यातून जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिलीय.

हिंगोलीनंतर परभणी, लातूर,बीडचा ते दौरा करणार आहेत. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी केली गेलीय. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर सर्व जागांवरती उमेदवार देणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी साम टीव्ही बोलताना दिलीय. मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्याकडे एक महिन्याचा वेळ मागितला,आम्ही तो वेळ दिलाय.

आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे,देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवलाय. त्याप्रमाणे सरकारने १३ जुलैपर्यंत आमची सगेसोयऱ्याची मागणीसह इतर मागण्या पूर्ण करतील असा विश्वास आम्ही ठेवलाय. त्याआधी मराठा आरक्षणासाठी दौरा केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाज एका ठिकाणी जमा होणार असल्याचं जरांगे म्हणालेत.हिंगोली,धाराशिव,बीड, मराठवाडामधील मराठा समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना एकत्र करण्याचं काम आम्ही या दौऱ्यातून करत असल्याची माहिती जरांगे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

SCROLL FOR NEXT