पण, तुम्ही ऊकिरडे फुंकत फिरलात : संजय राऊतांचा भाजपाला टोला  
महाराष्ट्र

पण, तुम्ही ऊकिरडे फुंकत फिरलात : संजय राऊतांचा भाजपाला टोला

उद्धव ठाकरेंनी कोवीड काळात जे काम केलं त्यांची दखल संपूर्ण जगाने देशाने घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाच्या जन आशिर्वाद यात्रेवर टिका केली आहे. जन आशीर्वाद यात्रेची काही गरज नसताना यात्रा काढली जातेय. पण या यात्रेमुळे तिसऱ्या लाटेला (Third Wave) निमंत्रण देण्याचे काम होणार आहे. त्याने राज्यात कोरोनाचं संकट वाढणार आहे. कोवीड काळात वर्क फ्राॅम होम (Work From Home) काळाची गरज आहे. पण तुम्ही ऊकिरडे फुंकत फिरलात, अशा शब्दांत नाव न घेता संजय राऊत यांचा नारायण राणे (Narayan Rane) आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना टोला लगावला आहे.

हे देखील पहा-

एका सर्वेक्षणात देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री काम करत नाही घरी बसतात अशी टिका केली, पण त्यांनी कोवीड काळात जे काम केलं त्यांची दखल संपूर्ण जगाने देशाने घेतली. कोविड महामारीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी राज्यात राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम केलं.अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे कोतुकही केले.

सर्वेक्षणात जो पोल आहे तो एका प्रतिष्ठित संस्थेचा पोल आहे आणि त्यांनी दिलेल्या या पोलमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याचा नाव नाहीये. स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं टाॅप पाचमध्ये नावं आहेत. विरोधकांचा काही म्हणू द्या त्यांनी याचा अभ्यास करायला हवा. याचं उत्तर विरोधकांनी दिलं पाहिजे, असं सांगतानाच त्याकाळात प्रत्येकाना वर्क फ्रॉम होमच करायचं होतं. तुम्ही उकीरडे फुंकत फिरलात कारण नसताना, त्याला आम्ही काय करणार, असा हल्लाही त्यांनी चढवला.

उद्धव ठाकरे प्रत्येक सर्व्हेत टॉपमध्ये आले आहेत. आताही या सर्वेक्षणात ते टॉप फाईव्हमध्ये आले आहेत.पुढच्या वेळी ते टॉप वन असतील. पण आता आमचे राजकीय यालाही विरोध करतील, पण उद्धव ठाकरे देशातील लोकप्रिय नेतृत्व आहेत. राज्याच्या जनतेला अभिमान आणि गर्व वाटावा असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच नेतृत्व आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT