Russia Ukraine War : खारकिव्ह मध्ये अडकलेल्या मुलांचे प्रचंड हाल, आई वडील चिंतेत! SaamTvNews
महाराष्ट्र

Russia Ukraine War : खारकिव्ह मध्ये अडकलेल्या मुलांचे प्रचंड हाल, आई वडील चिंतेत!

काल कर्नाटकमधील नवीन शेखरप्पा नावाच्या विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला, तो ऋषभच्याच कॉलेज चा विद्यार्थी आहे.

अरुण जोशी

अमरावती : युक्रेनमध्ये अमरावतीचे 11 विद्यार्थी अडकलेले होते. त्यापैकी साहिर तेलंग,अभिषेक बारब्दे हे दोनच विद्यार्थी अमरावतीला घरी पोहोचू शकले आहेत. मात्र, 9 विद्यार्थी अजूनही युक्रेन मध्ये अडकलेले आहेत, अमरावतीचा (Amravati) ऋषभ वैभव गजभिये हा विद्यार्थी ज्या भागात रशियाने आक्रमण केले त्या खारकिव्ह भागात अडकलेला आहे.

हे देखील पहा :

ऋषभ हा खारकिव्ह येथील VN कराजिया युनिव्हर्सिटी मध्ये MBBS च्या द्वीतीय वर्षाला शिकत आहे. 25 फेब्रुवारी पर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याने कॉलेज सोडू नये असा कॉलेजचा आदेश होता. त्यामुळे ऋषभने 26 फेब्रुवारी विमानाचे तिकीट काढलेले होते. मात्र, त्यापूर्वीच रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला सुरू केला आणि ऋषभ सह हजारो विद्यार्थी खारकीव्ह मध्ये अडकले. काल कर्नाटकमधील नवीन शेखरप्पा नावाच्या विद्यार्थ्याचा गोळीबारात मृत्यू झाला, तो ऋषभच्याच कॉलेज चा विद्यार्थी आहे.

ऋषभच्याच हॉस्टेल जवळ फ्रीडम स्क्वेअर नावाच्या बिल्डिंगवर बॉम्ब टाकण्यात आला. विद्यार्थ्यांकडचे पैसे संपले आहेत. बर्फ पडायला लागला असून तापमानात घट झाली आहे. त्यांची इंटरनेट सेवा ही बंद केल्याने आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून मुलांसोबत बोलणे बंद झाले आहे. त्यामुळे पालक मुलांसोबत संपर्क होत नसल्याने चिंताग्रस्त झालेले आहेत. आपल्या मुलाला व अडकलेल्या सर्व मुलांना सरकारने तातडीने भारतात परत आणावे अशी आर्त हाक ऋषभ च्या आईची आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारतीय कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT