Mohan Bhagwat Saam TV
महाराष्ट्र

Mohan Bhagwat: राम मंदिर बांधले म्हणजे कोणी हिंदूंचा नेता होत नाही, मोहन भागवतांचं मोठं विधान

Mohan Bhagwat On Ram Mandir: 'राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण राम मंदिराची निर्मिती झाली म्हणजे कोणाला हिंदूंचा नेता होता येतं असं नाही.', असं वक्तव्य मोहन भागवत यांनी पुण्यामध्ये केले आहे.

Priya More

'लोभ, लालच आणि आकसातून देवतांची होणारी हेटाळणी अमान्य आहे. इतरांच्या देवी देवतांची हेटाळणी करू नये. आपण सगळे मिळून मिसळून जगभरात राहतोय.', असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्म हा प्राचीन असून धर्माच्या अस्मितेतून राम मंदिराची निर्मिती झाली ती योग्यच आहे. राम मंदिर झालं पाहिजे असं हिंदूना वाटत होतं. पण राम मंदिराची निर्मिती झाली म्हणजे कोणाला हिंदूंचा नेता होता येतं असं नाही.', असे विधान केले आहे. पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे.

मोहन भागवत यांनी सांगितले की, 'आपला देश आता संविधानाने चालतो. जे निवडून येतील ते राज्य चालवतील. इंग्रजांच्या कारस्थानामुळे पाकिस्तान निर्माण झाला. ज्याची त्याची पूजा ज्याला त्याला लकलाभो पण नियम पाळले गेले पाहिजे. आपलं राष्ट्र इंग्रजांनी तयार केलेले नाही आपलं राष्ट्र सनातनी राष्ट्र आहे. संविधानाची प्रस्तावना, नागरिकांचे अधिकारी संसद बदलू शकत नाही. नागरिकांनी नियम पाळले पाहिजे.'

यासोबतच, 'विश्वगुरु भारत झाला पाहिजे असं आपल्या सगळ्यांना वाटतं कारण आपण सगळे भारतीय आहोत. विश्वाला गुरुची आवश्यकता आहे का? पूर्वीपेक्षा आजचे जग फार सुखी आहे. जगाचा संबंध एकमेकांशी वाढलाय विचाराने जग पुढे जातेय. जो कोणी आतापर्यंतचा जागाचा गुरु आहे त्याचा मार्गदर्शनात सगळं ठीक चाललं आहे. सुख सुविधा वाढल्या आहेत.पण मनुष्याजवळ सुख आहे का? सोयी सुविधा वाढली पण शांती नाहीये कोणीही गोळीबार करतंय, घटस्फोटाचे प्रमाण वाढले. युद्ध थांबत नाहीये, कुठे ना कुठे युद्ध सुरु आहे, कट्टरपणा कमी होत नाहीये, पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, जमीन प्रदूषित झालीय, पाहिजे तेव्हा पाऊस येत नाही येतो तेव्हा सगळं घेऊन जातो. हे आजच्या परिस्थितीचे वर्णन आहे.', असे भागवत म्हणाले.

मोहन भागवत यांनी पुढे सांगितले की, 'जगात सगळे सुखी होऊ शकत नाही. जगात 4 टक्के लोक जगातील 80 टक्के संसाधन वापरते. जगात हा नियम आहे. सगळ्याच चांगले होणार नाही. बलवान असतील त्यांच फक्त चांगलं होणार आहे. जगात अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे.मानव जात एकच आहे असं म्हणायची चाल आहे.खायला बकरीचे मास पाहिजे तर बकरी पळली पाहिजे. सायन्सच्या आधारवर सर्व सुरु आहे. ते देखील बदलत असतं.सायन्सचा फायदा ज्यांचा हाती साधनसंपत्ती होती त्यांनी घेतला. आज अशी स्तिथी आहे एक बाजू उजळ आहे. मानव म्हणून गौरवशाली आहे. पण दुसरी बाजू पृथ्वीचा विनाश करणारी आहे. त्यामुळे लोक चिंतेत आहेत.'

तसंच, 'या जगात एक राक्षशी प्रवृत्ती आहे तिला वाटत आम्ही म्हणू तस झालं पाहिजे. दुसरी प्रवृत्ती दैवी प्रवृत्ती आहे ती म्हणते आम्हाला जगूद्या तुम्हीही जगा. जगाला गुरुची आवश्यकता आहे आणि तो भारत होऊ शकतो. आपल्याला महासत्ता होईच नाही. कारण महासत्ता झाल्यावर काय करतात लोक ते आपल्याला माहित आहे. श्रीलंका भरतासोबत कशी वागली ते आपल्याला माहित आहे पण श्रीलंकेला पहिली मदत नेहमी भारताने केली. विश्वगुरु भारत झाला पाहिजे तर आपण काय कराव... या देशाची भक्ती आम्ही का करावी असा प्रश्न तरुणांना पडत असेल. भारत विश्वगुरु झाला तर ठेकेदारी बंद होईल. आमचं राष्ट्र परोपकारासाठी तयार झाले आहे.', असेही मोहन भागवत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

SCROLL FOR NEXT