mohan Bhagwat  saam tv
महाराष्ट्र

RSS ची आजपासून तीन दिवस बैठक, मोहन भागवत आणि जेपी नड्डा राहणार उपस्थित

साम टिव्ही ब्युरो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित विविध संघटनांची समन्वय बैठक आजपासून सुरू होत आहे. ही बैठक तीन दिवस होणार आहे. छत्तीसगडमधील रायपूर येथील जैनम मानस भवनात या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी होणार आहेत.

या समन्वय बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाशी संबंधित 36 संघटनांचे प्रतिनिधी, वैचारिक क्षेत्र, सेवा कार्य यासह सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर सखोल चर्चा करणार आहेत. ही बैठक सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.

अखिल भारतीय स्तरावरील या वार्षिक बैठकीत पर्यावरण, कौटुंबिक जागृती आणि सामाजिक समरसता या विषयांवर समन्वित प्रयत्नांबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह पाच सहकारी आणि प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. त्यात भारतीय मजदूर संघाचे हिरण्यम पंड्या आणि व्ही सुरेंद्रन, विश्व हिंदू परिषदेचे आलोक कुमार आणि मिलिंद परांडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आशिष चौहान आणि निधी त्रिपाठी यांचा समावेश असणार आहे.

रायपूरमध्ये आरएसएसशी संलग्न ३६ संघटनांच्या या समन्वय बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोषही सहभागी होणार आहेत. या बैठकीत भारतीय शेतकरी संघटनेचे दिनेश कुलकर्णी, विद्या भारतीयाचे रामकृष्ण राव, जीएम काशीपाठी, राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रमाचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. बैठकीत प्रत्येकजण आपापल्या परीने केलेले कार्य व कर्तृत्व याविषयी मांडणी करतील व कामांबाबत सविस्तर चर्चा करतणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT