Mohan Bhagawat Saam Tv
महाराष्ट्र

RSS Chief Mohan Bhagwat: संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती पसरवली जाते - मोहन भागवत

"धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही"

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर - रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.संघाकडून किंवा संघटित हिंदू समाजाकडून धोका असल्याची अकारण भीती तथाकथित अल्पसंख्यांकांमध्ये पसरविली जात आहे असे सरसंघचालकांनी म्हटले आहे. (Tajya Batmya)

अन्याय, अत्याचार, द्वेषभावनेतून समाजात गुंडगिरी करणाऱ्या सामाजिक शत्रूपासून स्वतःचे व आप्तांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असते. सक्षम हिंदू समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यात कोणाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. समाजात बंधुभाव, सभ्यता आणि शांती राखण्याकरिता संघ संपूर्ण दृढनिश्चयानिशी काम करत राहाणार आहे असे देखील मोहन भागवत म्हणाले.

धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही

देशात धर्माच्या सर्व बाबी विचारात घेऊन लोकसंख्या धोरण तयार व्हायला हवे, आणि ते सर्वांसाठी समान रीतीने लागू करायला हवे अशी मागणी मोहन भागवत यांनी केली आहे. जनजागृती करून लोकांची त्यासाठी मानसिकता तयार करावी लागेल. तरच लोकसंख्या नियंत्रणाचे नियम परिणामकारक ठरू शकतील.

चीनने लोकसंख्या नियंत्रण धोरण बदलून लोकसंख्यावाढीचे धोरण स्वीकारले आहे. आपल्या देशातील लोकसंख्येचादेखील देशहिताच्या दृष्टीने विचार करता येणे शक्य आहे. आज भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. ५० वर्षांनंतर आजचा युवक वर्ग ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत दाखल होईल, तेव्हा त्यांचा सांभाळ करण्यासाठी किती तरुणांची गरज असेल याचाही विचार आपल्याला आज करावा लागेल, असा सल्ला भागवत यांनी दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत धो धो पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली

LIC AAO Recruitment: LIC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार १६९००० रुपये; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Oldest Water on Earth: कॅनडातील शास्त्रज्ञांनी चाखलं २०० कोटी वर्षांपेक्षा जुनं पाणी; शास्तज्ञांकडून पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल मोठा खुलासा

Mumbai ganeshotsav: देशातील सर्वात श्रीमंत बाप्पा, 474 कोटींचा गणपती

Mumbai Rain: मुंबईकरांनो, घरातून बाहेर पडू नका! IMD कडून ३ तास धोक्याचा इशारा, त्यात वाहतूककोंडी अन् लोकलला लेट मार्क!

SCROLL FOR NEXT