Mohan Bhagwat Saam TV
महाराष्ट्र

Mohan Bhagwat : प्रत्येक जोडप्याला किमान ३ मुले पाहिजेत; मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

Mohan Bhagwat Latest Speech : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटणाऱ्या लोकसंख्येविषयी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येक जोडप्याने ३ मुलं जन्माला घालावीत, असा सल्लाच मोहन भागवत यांनी दिला आहे.

Saam Tv

पराग ढोबळे, साम टीव्ही

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. लोकसंख्या घटणे ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते, तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने दोन किंवा तीनपेक्षा जास्त मुलं जन्माला घालायला हवीत, हे महत्त्वाचे आहे, असे मोहन भागवत म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

नागपुरातील कठाळे परिवाराच्या सामाजिक कार्याला 25 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त कठाळे कुल संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी लोकसंख्याबाबत चिंता व्यक्त केली.

मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

लोकसंख्येतील घट ही चिंतेची बाब आहे. आधुनिक लोकसंख्या विज्ञान सांगते की जेव्हा एखाद्या समाजाची लोकसंख्या (प्रजनन दर) 2.1 च्या खाली जाते तेव्हा तो समाज पृथ्वीवरून नाहीसा होतो. संकट नसतानाही तो समाज नष्ट होतो. त्यामुळे अनेक भाषा आणि समाज नष्ट झाले आहेत. लोकसंख्या 2.1 च्या खाली जाऊ नये, आपल्या देशाचे लोकसंख्या धोरण 1998 किंवा 2002 मध्ये ठरविण्यात आले होते. परंतु त्यात असेही म्हटले आहे की समाजाची लोकसंख्या 2.1 पेक्षा कमी नसावी. आपल्याला दोन किंवा तीनपेक्षा जास्त हवे आहेत, हे लोकसंख्या विज्ञान सांगते. संख्या महत्त्वाची, आहे कारण समाज टिकला पाहिजे.

संस्कृती महत्त्वाची, ती टिकवली जाते - भागवत

कुलनीती चालली पाहिजे त्यातून संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. आपली संस्कृती टिकवली जाते. माणसाचा स्वभाव मिळविणार असला पाहिजे, पण त्यासोबत वाटणाऱ्यांचा सुद्धा असला पाहिजे. वाटणाऱ्यांचा मान मोठा असतो. माणसाचा स्वभाव असतो आणि समाजाची संस्कृती असते. महिलेचं महत्व आपल्या संस्कृतीत मातेचं असतं,पाश्चात्य संस्कृतीत पत्नीच महत्त्व असते, असे मोहन भागवत म्हणाले.

'धन माणसाजवळ असावं पण ते गरजेपेक्षा जास्त असू नये. घरात लागलेलं वळण फार महत्त्वाचं असतं. कारण ते परंपरेने चालत आलेलं असतं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये या गोष्टी वेगळ्या प्रकारे होतात, त्यांच्याकडे सुद्धा संस्कृती होती. पण त्यांना आता त्याचा विसर पडला आहे. मात्र आपल्याकडे संस्कृती अजून जपली जात आहे. घरातील लहान लहान गोष्टीतून आपली संस्कृती जपली जाते, ही व्यवस्था आपल्याकडे आहे. कुटुंबांपासून संस्कृती गाव आणि मग राज्यात जाते. समाजाचा घटक कुटुंब आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

'जनसंख्या कमी झाली 2.1 च्या खाली आला की तो समाजा नष्ट होत असतो. आपल्या संस्कृतीची जगाला आवश्यकता आहे, आपल्याला त्यांना जोडता यायला पाहिजे. जगात इतकी भांडण सुरू आहेत, कारण अंहकार स्वार्थ आणि कट्टरपणा वाढत आहे. त्याला आता आपल्या सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या संस्कृतीची गरज आहे. सगळं जग सुखी व्हावं यासाठी विचार करणं म्हणजे धर्म होय, असे मोहन भागवत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT